पुणे : पुणे वाहतूक पोलिसांचा मुजोर कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. वाहतूक पोलिसांनी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टोईंग करुन टेम्पोत भरल आहे. परंतु, वाहनचालक जर चुकत असेल तर अशा पध्दतीनं कारवाई करणं कितपत योग्य आहे, असा संतप्त सवाल पुणेकर विचार आहेत.
दुचाकीस्वार त्याच्या दुचाकीवर पार्किंगमध्ये बसलेला असताना त्याची दुचाकी उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेमध्ये हा प्रकार घडला आहे. समर्थ वाहतूक विभागाच्या हद्दीत काल गुरुवारी दुपारी 4 वाजता ही घटना घडलीय. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुणे वाहतूक पोलिसांच्या या कारवाईवर सवाल उपस्थित केला जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या दुचाकीस्वाराचे नाव समजू शकलेले नाही, मात्र प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती जेव्हा टोईंग व्हॅन आली तेव्हा त्याच्या बाईकवर बसलेली होती. त्याने वाहतूक हवालदाराला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ‘मी फक्त 5 मिनिटांसाठी इथे थांबलो होतो.’ त्याने विनंतीही केली की माझी बाईक उचलू नका. तरीही त्याची बाईक जबरदस्तीने उचलून नेण्यात आली.
वाहतूक पोलिसासोबत तडजोड शुल्काबाबत बोलत असतानाच त्याची बाईक उचलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आज शुक्रवारी पुण्यात आले होते. काऊन्सिल हॉलमध्ये झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना या घटनेबाबत विचारण्यात आले. यावर गृहमंत्री म्हणाले की ही घटना की अशोभनीय असून या प्रकाराची चौकशी केली जात असल्याचे सांगितले.