मुंबई : मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन हा अपघात झाला. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथून मजूर घेऊन समृद्धी हायवेच्या कामावर हे मजूर जात होते. एकूण 15 मजूर होते.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. हा संपूर्ण महामार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी वेगाने महामार्गाचे काम सुरू आहे, त्याच दरम्यान तळेगाव येथे भीषण अपघात झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथून मजूर घेऊन समृद्धी हायवेच्या कामावर हे मजूर जात होते. त्याच दरम्यान तळेगाव येथे हा अपघात झाला आहे.
समृद्धी महामार्गावर दुसरबीड सिंदखेडराजा रोडवर टिपर ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात सात ते आठ मजूर ठार झाल्याची माहिती आहे आध्याप मूतकाची ओळख पटली नाही. सिंदखेडराजा रोडवर टिपर ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात सात ते आठ मजूर ठार झाले आहेत. अद्याप मृतांची ओळख पटली नाही.
समृद्धी महामार्गावर काम करणारे बिहारी मजूर असल्याचं वृत्त समोर येत आहे. एकूण 15 मजूर होते आणि त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात इतरही काही मजूर जखमी झाले आहेत. या जखमी मजूरांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.