मुंबई : नारायण राणे आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात स्पष्टीकरण देताना सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच आमच्याविरुद्ध आमच्या परिवाराविरुद्ध, आमच्या कुटुंबाच्या विरुद्ध, आमच्या पत्नीविरुद्ध तुम्ही काय काय केलं. तो आमचा वैयक्तिक मामला आहे. आम्ही त्याला सक्षम आहोत. तो माझा प्रश्नच नाही. पण एवढे सांगू शकतो, की दुटप्पी भूमिका असू नये,’ असं फडणवीस म्हणाले.
नारायण राणेंनी केलेल्या त्या वक्तव्याचं समर्थन आम्ही करत नाही.देवेंद्र फडणवीस म्हणाले, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात नारायण राणे यांनी जे काही वक्तव्य केलं त्यातून एक वाद उभा राहिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मला असं वाटतं की, बोलण्याच्या भरात नारायण राणे तसं बोलले असतील. तसं बोलण्याचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री हे पद फार महत्त्वाचं आहे. त्या पदाबद्दल बोलत असताना संयम बाळगणे महत्त्वाचे आहे.
मुख्यमंत्र्यांविषयी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाच्या पाठिशी भाजप नाही, असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. पण राणे रागात बोलले असतील, त्यामुळे त्यांच्याविरोधात होत असलेली कारवाई चुकीची आहे, आम्ही राणे यांच्या बाजूने आहोत, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच भाजपच्या कार्यालयांवर हल्ला केला तर ते सहन केले जाणार नाही, पोलिसांनी कायद्याने काम करावे, असेही ते म्हणाले.