मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे महिन्याला 12 लाख इतका पगार घेतात, अशा बातम्या माध्यमात झळकल्या आहेत. त्यानंतर शिंदेंची पोलीस आयुक्तांनी डीबी मार्ग पोलीस ठाण्यात बदली केली आहे. शिंदेंना अमिताभ बच्चन यांच्याकडून अंदाजे दीड कोटी रुपये वार्षिक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. शिंदे यांची स्वतःची सिक्युरीटी एजन्सी देखील आहे.
बिगबींसह अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण, शाहरुख खान आणि सलमान खान असे अनेक बॉलिवूड स्टार आपल्या पर्सनल बॉडीगार्ड्सला तगडा पगार देत असल्याचे वृत्त आहे. त्यात अमिताभ यांचे अंगरक्षक म्हणून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसातील हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांच्यावर आहे. आता सर्वत्र त्यांच्या वार्षिक पगाराची चर्चा सुरु होती. जितेंद्र यांचा वार्षिक पगार हा दीड कोटी रुपये असल्याचे समोर आल्यानंतर गुरुवारी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जितेंद्र यांची बदली ही डीबी मार्ग पोलिस ठाण्यात केली.
जितेंद्र शिंदे हे सावलीसारखे अमिताभ बच्चन यांच्या सोबत नेहमी दिसून येतात. शिंदे यांच्या पगाराबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. जितेंद्र शिंदे यांचा पगार हा एखाद्या बड्या कंपनीच्या सीईओपेक्षाही अधिक आहे. त्यांच्या वेतनाचा आकडा थक्क करणारा आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र वर्षाला दीड कोटी रुपये कमवतात. म्हणजे ते महिन्याला जवळपास 12 लाख रुपये इतका पगार घेत असल्याचं समोर आलं आहे. जितेंद्र शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून बिग बींना सुरक्षा पुरवत आहेत. शिंदे हे बिग बींच्या सोबत सावलीसारखे असतात. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं बारीक लक्ष असतं, तसेच चाहत्यांच्या गराड्यातून त्यांना बाहेर काढणं, सुरक्षा करणं अशी महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
जितेंद्र शिंदे यांची सिक्युरीटी एजन्सी देखील आहे. परंतु, अमिताभ यांच्या सुरक्षेसाठी ते स्वत: हजर असतात. अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील अत्यंत मोठे नाव. त्यांचा चाहतावर्गही जबरदस्त आहे. अशावेळी त्यांच्या सुरक्षेची अत्यंत मोठी जबाबदारी जितेंद्र शिंदे यांच्यावर असते. अमेरिकेचा सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता एलिजा वुड भारतात आला होता त्यावेळी देखील शिंदे यांनी त्यांना सुरक्षा पुरवली होती. अर्थात बिंग बी बच्चन यांच्या सांगण्यावरूनच शिंदे यांनी एलिजा वुडला सुरक्षा दिल्याची माहिती आहे.
पोलीस कर्मचाऱ्याला सरकारी पगार मिळत असताना अशा पद्धतीने पैसे घेण्याची परवानगी नाही. राज्य सेवा नियमांच्या हे विरोधात आहे. जितेंद्र त्यांच्या वार्षिक उत्पन्नाबद्दल आणि त्यांच्या मालमत्तेबद्दल पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली होती का? आणि ते दुसऱ्या व्यक्तीकडून पगार घेत होते का? याची चौकशी राज्य सरकार करत आहे.