नवी दिल्ली : केंद्र सरकारनं सर्व राज्यांना MIS योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावेत, असे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी टोमॅटोच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. अखेर मोदी सरकारने या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एमआयएस योजनेंतर्गत राज्य सरकारांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावेत, अशी सूचना मोदी सरकारने सर्व राज्यांना केली आहे.
टोमॅटो खरेदी करताना या व्यवहारात राज्य सरकारला जो तोटा सहन करावा लागेल, त्यातील 50 टक्के वाटा केंद्र सरकारकडून राज्याला देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून देशात टोमॅटोचे भाव मातीमाेल झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अक्षरक्ष: 25 पैसे किलोने टाेमॅटो विकण्याची वेळ आल्याने, शेतकरी बाजार समितीच्या आवारात टोमॅटो फेकून देऊन सरकारच्या नावाने शिमगा करीत आहेत.
सध्या देशात टोमॅटोचे भाव कमी झाल्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एमआयएस योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावेत अशा सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी टोमॅटोच्या प्रश्नावर पियुष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेऊन चर्चा केली होती.
राज्यातील शेतकरी सध्या टोमॅटोचे भाव पडल्यामुळे त्रस्त होऊन आक्रमक झाले आहेत. एमआयएस योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालात राज्य सरकारला जो काही तोटा होईल, त्या तोट्यात केंद्र सरकारचा 50 टक्के वाटा असेल असं केंद्र सरकारच्यावतीने सांगण्यात आलं आहे. तसेच याबाबतीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवावा अशीही त्यांनी राज्याला विनंती केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात यावर्षी टोमॅटोचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न झालं आहे. मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्यामुळे भाव पडले आहेत. सध्या राज्यात टोमॅटोचे भाव प्रतिकिलो 2 ते 3 रूपये असे आहेत. या अल्पशा भावामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.