मुंबई / जालना : केंद्राने राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केल्यानंतर राज्यात अधिक काळजीची गरज असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. तसेच केरळमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या सुचनेची अंमलबजावणी होईल, मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असंही टोपे म्हणाले. दरम्यान, केरळमध्ये रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लावण्यात आली होती. आता राज्यात कोरोना रूग्णसंख्या कमी अधिक प्रमाणात होताना दिसत आहे. मात्र केरळ राज्यात कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकारकडून राज्यांना खबरदारीचा इशारा आला आहे.
याला विचारात घेता केंद्र सरकार ने या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून रात्रीची संचारबंदी चा विचार करण्यास सांगितले होते. केरळमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
केंद्राने राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केल्यानंतर केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता सणासुदीचा काळ जवळ येता आता विशेष काळजी घेण्याची गरज आहे, त्यामुळे केंद्राने राज्यात रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केल्यानंतर केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता सणासुदीचा काळ जवळ येता आता विशेष काळजी घेण्याची गरज आहे त्यामुळे रात्रीची संचारबंदी लावण्याची शक्यता वर्तवली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री ठाकरे घेतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालनामध्ये माध्यमाशी बोलताना दिली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील रूग्ण वाढीबद्दलही केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केली होती. यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीबाबत केंद्र सरकारने संचारबंदी संदर्भात महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत. ज्या भागात कोरोनाचा संसर्गदर जास्त आहे, त्या भागात रात्रीच्या वेळी काही दिवसांकरीता संचारबंदीचा अवलंब करावा, अशा सुचना केंद्र सरकारने दिल्या असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. केंद्राच्या सुचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्कीच करेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या संदर्भात निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
येत्या महिन्यात दहीहंडी आणि गणेशोत्सव सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. राज्यात सध्या कोरोना रूग्णांचा दर कमी असला तरी केरळ राज्यात रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून खबरदारी घेण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा रात्रीची संचारबंदी लागू करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सणासुदींच्या काळामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, त्या ठिकाणी जाणं लोकांनी टाळलं पाहिजे. तसेच सरकारने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केलं पाहिजे, असंही राजेश टोपे म्हणाले.