मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी गूड न्यूज आहे. भारतीय पोस्ट विभागाने पोस्ट डाक सेवक या पदासाठी भरती सुरु केली आहे. एकूण 4845 जागांसाठी भरती करणार आहे. 23 ऑगस्टपासून यासाठी अर्ज करता येणार आहे. 22 सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. अर्ज करण्यासाठी https://appost.in/gdsonline या लिंकवर क्लिक करा.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी गूड न्यूज आहे. पोस्टात 10 वी पास असलेल्या तरुण तरुणींसाठी नोकरीची संधी आहे. भारतीय पोस्ट विभागाने पोस्ट ( डाक सेवक या पदासाठी भरती सुरु केली आहे. एकूण 4 हजार 845 जागांसाठी भरती करणार आहे. इच्छुक उमेदवार पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ही भरती केवळ उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांसाठी आहे. या भरतीसाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 23 ऑगस्टपासून सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड ही मेरिटच्या आधारे करण्यात येणार आहे.
या भरतीसाठी 23 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली. तर 22 सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. जीडीएस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी पास हवा. 10 वीला इंग्रजी आणि गणित या विषयांचा समावेश असावा. या पदासाठी 18 ते 40 वयादरम्यानचे उमेदवार अर्ज करु शकतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध