कोल्हापूर / सोलापूर : पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापुरात मध्यरात्रीच्या सुमारासभूकंपाचा धक्का जाणवला आहे. रात्री 12 वाजण्याच्यासुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. यामुळे नागरिकांमध्येएकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे.कोल्हापुरपासून 19 किलोमीटर पश्चिमेकडे भूकंपाचे केंद्रअसल्याचंही म्हटलं जात आहे.
कोल्हापुरात काल रात्री 11 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणावला आहे. 3.9 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यानं कोल्हापूर हादरलं. कोल्हापूरपासून 19 किलोमीटर कळे गावाजवळ केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. सौम्य भूकंपाचे धक्के असले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. काही भागांत भूकंपाचे धक्के सर्वसामान्यांना जाणवले नसल्याचीही माहिती समोर येत आहे.
Seismo.gov.in च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथे रात्री 11 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. कोल्हापुरपासून 19 किलोमीटर पश्चिमेकडे भूकंपाचे केंद्र असल्याचंही म्हटलं जात आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील माहिती दिली.
वारणा खोरे व कळे हे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. भूकंपाची खोली जमिनीच्या आत ३८ किलो मीटर असल्याने भूकंपाचा धक्का जाणवला नाही. वारणा भुमापन केंद्रावरही या भूकंपाची नोंद झाली आहे. भूकंपाची नोंद झाल्यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष दक्ष झाले होते पण कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. कोयना धरणावरील भूमापन केंद्रावरही उजनी खरात भूकंप झाल्याची नोंद आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोल्हापूरबरोबरच आजूबाजूच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याचबरोबर, सोलापूर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याबाबतचे वृत्त एका संकेतस्थळानं दिलं आहे.
सोलापूर शहराला काल शनिवारी रात्री पावणेबारा ते 12 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याचे वृत्त एका संकेतस्थळावरून देण्यात आले. रात्री बारा वाजल्यापासून सोशलमीडियावर जो तो भीतीच्या सुरात विचारला जात आहे. याबाबत घबराटीचे वातावरण पसरले.
सोलापूर शहरासह पंढरपूर परिसरात शनिवारी रात्री 11:57 च्या सुमारास भूकंप झाल्याची चर्चा होत आहे. भूकंपाची तीव्रता सोलापुरात जाणवली नाही मात्र सात रस्ता परिसरात जाणवल्याचे वृत्त आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हे कर्नाटक राज्यातील विजयपूर हे असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर याची माहिती नाही मात्र राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत ट्विटर वेबसाईटवर कोल्हापूरमध्ये भूकंप झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे त्यांची तीव्रता ही 3.9 होती.
संकेतस्थळावरील पेज व्हायरल होत असून त्यामध्ये भूकंपाची वेळ रात्री 11 वाजून 57 मिनिटांची होती, तीव्रता सुमारे 4 एवढी असल्याचे वृत्त आहे, किमान 10 किलोमीटर अंतरावर 4 ची तीव्रता होती असे दर्शवले गेले आहे.
विजयपूर सह भूकंपाचे धक्के हे कर्नाटकातील इंडी, अफजलपूर, सिंदगी, सोलापूर, पंढरपूर या भागात बसल्याचे वृत्त आहे. याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नाही. रात्री उशिरा धक्के बसल्याने आता रविवारी दिवसभर याची माहिती घेतली जात आहे. यात कुठे पडझड, वित्तहानी झाल्याची माहिती नाही. या वृत्ताला अधिकृत भूकंपमापन यंत्रणेचा मात्र कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. शहरवासीय मात्र गूढ आवाज अन् इमारतीला कंपन जाणवल्याने घराबाहेर पडले.