टोकिओ : भारतासाठी आणखी एक खुशखबर आहे. पॅरालिम्पिकमध्ये कृष्णा नागर याने इतिहास रचला आहे. कृष्णाने भारताच्या खात्यात पाचवे सुवर्णपदक आणले आहे. कृष्णाने हॉन्गकॉन्गच्या चू मान कायचा 2-1 असा पराभव केला. कृष्णाने काल झालेल्या सेमीफायनलमध्ये ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टन कूंब्सला पराभूत करत फायनलमध्ये एन्ट्री मारली होती.
कृष्णा नागरने भारताच्या खात्यात पाचवे सुवर्णपदक आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृष्णाचे कौतुक केले आहे. आमच्या बॅडमिंटन खेळाडूंना टोकियो पॅरालिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना पाहून आनंद झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कृष्णा नागर याच्या उल्लेखनीय पराक्रमाने प्रत्येक भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य आणले आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याच्या पुढील प्रयत्नांसाठी त्याला शुभेच्छा, असे ते म्हणाले.
टोकियो पॅरालिम्पिकचा आज 12 वा आणि शेवटचा दिवस आहे. बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारतीय पॅरा खेळाडू सुहास यथिराज याने रौप्य पदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात त्याला फ्रान्सच्या खेळाडूविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. सुहासने रौप्य पदक जिंकून देशाचा गौरव वाढवला आहे. दरम्यान, सुहास हे नोएडाचे कलेक्टर देखील आहेत.