नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं इन्फोसिस कंपनीवर मोठे आरोप केले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक पांचजन्य मासिकामधून इन्फोसिसने नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत, असंही पांचजन्यमध्ये म्हटलं आहे. इन्फोसिस कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना ? असा सवाल मासिकामध्ये विचारण्यात आला आहे.
बंगळुरु स्थित आयटी कंपनी इन्फोसिसच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा कर आणि आयकर पोर्टलमधील त्रुटी संबंधित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक पांचजन्य साप्ताहिक मासिकामध्ये शंका उपस्थित करण्यात आली आहे.
कोणतीही ‘राष्ट्रविरोधी शक्ती’ याद्वारे भारताचे आर्थिक हितसंबंध दुखावण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल या साप्ताहिक मासिकामध्ये RSS नं सवाल उपस्थित केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसंच इन्फोसिसवर या मासिकाद्वारे नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत, असंही पांचजन्यमध्ये म्हटलं आहे.
इन्फोसिस कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका या साप्ताहिकामध्ये उपस्थित करण्यात आली आहे. आत्तापर्यंत RSS कडून असे आरोप किंवा टीका विशिष्ट व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा त्याचे कार्यकर्ते आणि विशिष्ट संघटनेच्या काही विभागांवर करण्यात आली आहे. मात्र एखाद्या कॉर्पोरेट कंपनीवर एवढा मोठा आरोप करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे.
वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक त्रुटींच्या अनुषंगानं देखीलही टीका करण्यात आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला मुद्दामहून अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असा आरोपही करण्यात आला आहे.