सोलापूर : पोलीस भरतीच्या वेळी मला कमी मार्क दिले, त्यामुळे मी पोलीस झालो नाही. याचा राग धरून सळई आणि हाताने केलेल्या मारहाणीत फौजदार जखमी झाले. ही घटना रविवारी (ता. ५) दुपारच्या सुमारास जुळे सोलापुरातील बनशंकरी नगरात घडली. या प्रकरणात विजापूर नाका पोलीसांनी कपिल बाजीराव खरात (वय ४१ रा.बनशंकरी नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलीस आयुक्तालयातील फौजदार अविनाश नामदेव घोडके (वय५६ रा. म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर) हे काल दुपारी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन प्रसाद नगर येथे निघाले होते. बनशंकरी नगराजवळ कपिल खरात याने त्यांची दुचाकी अडवली. आणि तुझ्यामुळेच मी पोलीस झालो नाही, असे म्हणत त्याने मारहाण केली. त्यावेळी फौजदार घोडके यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी येऊन कपिल खरात याला ताब्यात घेतले. हवालदार उपासे पुढील तपास करीत आहेत .
* क्रेनच्या धडकेने, मध्य प्रदेशचा तरुण ठार
सोलापूर : रस्ता दुरुस्तीकरणाऱ्या क्रेनच्या धडकेने मध्यप्रदेश येथील पायी जाणारा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात पुणे महामार्गावरील केगाव नजीक असलेल्या एसएसडीपीएल कंपनी जवळ रविवारी रात्रीच्या सुमारास घडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रविशंकर बसेरीलाल मरावी (वय २७ रा. शिवनी, मध्यप्रदेश) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो केगाव येथील एका कारखान्यात मजुरीचे काम करीत होता. रात्रीच्या सुमारास तो मोहनलाल वाडिया (रा. शिवनी) याच्या सोबत गावात जाऊन दोघे कारखान्याच्या दिशेने पायी निघाले होते. त्याचवेळी पाठीमागून क्रेन धडकल्याने तो गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मरण पावला. या अपघाताची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली. पोलीसांनी दिगंबर अभिमान पांढरे (रा. चिंचोळी, ता. मोहोळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहाय्यक निरीक्षक मंडले पुढील तपास करीत आहेत.
* घरात घुसून तरुणीचा विनयभंग