अकलूज : ग्रामीण भागांसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये प्रसिध्द असलेला शिवामृतचा दूध पेढा व केशर पेढा ग्राहकांना दुकानांत बेकरी मध्ये मिळत आहे, आता ग्राहकांच्या वाढत्या मागणीचा विचार करून ग्राहकांना घरपोहच सेवा देण्यासाठी शिवामृतचा दूध पेढा व केशर पेढा ऑमेझॅन या ऑनलाईन विक्री वेबसाईटवर उपलब्ध झाल्याची माहिती शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन धैर्यशील मोहीते पाटील यांनी दिली.
दुध पेढा आणि केशर पेढा उत्पादन घेऊन शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघाने आकर्षक पॅंकिंग, उत्कृष्ट दर्जा व ग्राहकांच्या पसंतीस उतरणारा शिवामृतचा दूध पेढा व केशर पेढा हे ग्राहककेंद्रीत उत्पादने बाजारात आणले व अल्पावधीतच हे उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. ग्राहकाच्या वाढत्या मागणीनुसारच ग्राहकांना ऑमेझाॅन या जगप्रसिद्ध ई काॅमर्स विक्री वेबसाईटवर शिवामृतने पेढा विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याने ग्राहक घरपोहच आपल्या इच्छीतस्थळी शिवामृतचा दर्जेदार दूध व केशर पेढा मागवू शकणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पेढ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पॅकिंग नंतर 30 दिवसानंतर सुद्धा या पेढ्याच्या चवीत कोणताही बदल होत नाही व 30 दिवस खराब होत नाही. शुद्ध, दर्जेदार उत्पादनामुळे शिवामृतच्या केशरपेढ्याच्या व इतर उत्पादनांच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. त्यातच ऑमेझॅनवर विक्रीस उपलब्ध झाल्याने ग्राहकांसाठी पर्वणीच आहे.
“ग्राहकांची विश्वासार्हता जपलेल्या शिवामृतचा पेढा व अन्य उत्पादन खरेदी करण्याचा आमचा कल असतो सणासुदीच्या काळात शिवामृतने ग्राहककेंद्रीत निर्णय घेऊन आपला पेढा ऑॅमेझॉनवर घरबसल्या उपलब्ध करून दिल्याने आम्हाला उत्पादन खरेदी करने अधिक सोयीचे झालंय”
सागर शर्मा – ग्राहक , माढा