रत्नागिरी : रत्नागिरीतील राऊफ हजवा हा मच्छीमार एका माशामुळे लखपती झाला आहे. या मच्छीमाराला जाळ्यात घोळ मासा सापडला होता. हरणे बंदरावर या माशाला तब्बल दोन लाखांची बोली लागली आहे. या माशामुळे राऊफ हजवा लखपती झाले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातील मुरबे येथील मच्छीमाराला जाळ्यात 157 घोळ मासे सापडले होते. त्याचे त्याला 1 कोटी 25 लाख रुपये मिळाले होते.
मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या हरणे बंदरावर एका मच्छीमाराला लाखो रुपये किंमत असणारा मासा सापडला. या माशाला लिलावात तब्बल दोन लाखांची बोली लागली आहे. राऊफ हजवा असे लखपती झालेल्या मच्छीमार तसेच बोटमालकाचे नाव आहे. मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या हरणे बंदरावर मच्छीमाराजवळ असलेल्या माशाला तब्बल दोन लाखांची बोली लागली आहे.
मुरबे येथील चंद्रकांत तरे आणि त्याचे सहकारी असलेल्या अन्य आठ सहकाऱ्यांसह 28 ऑगस्ट रोजी आपली बोट मासेमारीसाठी घेऊन रवाना झाले. डहाणू-वाढवण च्या समोर समुद्रात साधारणपणे 20 ते 25 नॉटिकल समुद्रात हरबा देवी बोटीतून समुद्रात जाळी टाकण्यात आली.
समुद्रात दुर्मिळ असणारा हा मासा क्वचितच आढळून येतो. हा मासा सहसा मच्छीमारांच्या जाळ्यात सापडत नाही. परंतु ज्या जाळ्यात हा मासा सापडतो तो लखपतीच होतो. माशाची किंमत ऐकून बहुतांशी ग्रामस्थांत चर्चा सुरु आहे. हा मासा औषधी गुणधर्मासाठीही ओळखला जातो. त्याच्या शरीरामधला पाईप ऑपरेशनचा दोरा बनवण्यासाठी वापरतात. याची किंमत सोन्यापेक्षाही अधिक असल्याने माशाला मार्केटमध्ये खूप किंमत असते. यापूर्वीही असाच प्रकार पालघर जिल्ह्यातून समोर आला होता. येथील मच्छीमार चंद्रकांत तरे यांना मासेमारी करताना दीडशेहून अधिक घोळ जातीचे दुर्मिळ मासे सापडले होते. या माशांची बाजारात विक्री झाल्याने ते एका रात्रीत करोडपती बनले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वागरा पद्धतीची जाळी समुद्रात सोडल्यावर काही तासाच्या प्रतिक्षे नंतर बोटीतील मच्छीमारांनी समुद्रात सोडलेली आपली जाळी बोटीत घेण्यास सुरुवात केली. त्या जाळ्या मध्ये एकूण 157 घोळ आणि दाढे मासे सापडल्याने त्याचे नशीब फळफळले.
दरम्यान असाच एक प्रसंग काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात घडला. मुरबे येथील हरबा देवी ही मासेमारी बोट वाढवणच्या समोर समुद्रात मासेमारीला गेली असता 31 ऑगस्ट रोजी त्यांच्या जाळ्यात 157 घोळ मासे सापडले. त्या माश्याचे मांस आणि त्याच्या पोटातील भोत(ब्लॅडर) यांची विक्री करुन त्या मच्छीमार ग्रुपला सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये मिळाले होते.
* असा कसला मासा
मच्छीमाराच्या जाळ्यात अडकलेल्या माशाचे ना घोळ असे आहे. घोळ मासा हा अत्यंत चविष्ट असतो. तसेच त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. याच कारणामुळे या माशाची किंमत लाखो रुपये असते. घोळ मासा सहजासहजी जाळ्यात सापडत नाही. मात्र, एकदा का हा मासा सापडला की त्याला विकून मच्छीमार लखपती होतो हे मात्र निश्चित असते. असंच काहीसं राउफ हजवा यांच्या बाबतीत झालं. हवजा यांच्या बोटीवर काही मच्छीमार मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात हा घोळ मासा आला.
घोळ मासा जाळ्यात अडकल्याचे समजताच आता आपली लॉटरी लागली हे हवजा यांना समजले. त्यांनी रत्नागिरीच्या हरणे या प्रसिद्ध बंदरावर त्या माशाची विक्री केली. या घोळ माशाला तब्बल 2 लाखांची बोली लागली. एका माशामुळे राउफ हवजा लखपती झाले आहेत.