बार्शी : सुमारे साडेआठ लाख रुपये किमतीचे नऊ हजार लिटर डिझेल काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना बार्शी शहर पोलिसांनी पकडले. याप्रकरणी डिझेलसह टँकर असा सुमारे १८ लाख ५५ हजारांचा ऐवज वस्तू करुन जीवनावश्यक कायद्याप्रमाणे जणांविरुद्ध पाच गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस नाईक लक्ष्मण भांगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. टँकरचा चालक प्रदीप समरबहादुर यादव (रा. नालासोपारा ईस्ट जि. पालघर), पवन श्रीरामचंद्र तिवारी (रा. नालासोपारा), विठ्ठल पिठारे (रा. वाकड, पुणे) मनोज होनमाने ( रा. माळी नगर अकलुज), सिताराम भरणे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. चालक प्रदीप व त्याचा सहकारी पवन या दोघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांना दि. १६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस नाईक लक्ष्मण भांगे, पोलीस हवालदार अरुण माळी हे दोघेजण बार्शी शहरात बाजारपेठेत गस्तीसाठी जात असताना हिंदुस्तान बेकरी जवळ नो एंट्रीमध्ये तेल टँकर (एम एच०४ के एफ १८३१ ) समोरून येताना दिसला. टँकरवर कोणत्याही तेल वितरक कंपनीचे नाव नसल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे त्यास पोलीस ठाण्यास आणून वरिष्ठांना कल्पना दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलिसांनी चालक प्रदीप टँकरमध्ये असलेल्या बिल पावतीची यास डिझेलच्या मागणी केली असता चालकाने असमर्थता दर्शवली. चालक प्रदीप याने हा टँकर मुंबई येथे मनोहर मेहर पेट्रोकेमिकल येथे ९ हजार लिटर डिझेल तीन कप्यांत भरले आहे. सदर डिझेल हे विठ्ठल पिठारे (रा. वाकड पुणे ) याने भरून दिले आहे. ते मनोज होनमाने व सिताराम भरणे याच्या करता भरले असून ते मुंबई येथून लातुर करीता घेवुन जात आहे.
सदरचे डिझेल हे काळ्या बाजारात विक्री करता घेवुन जात असल्याने त्याबाबचे कोणतेही कागदपत्र त्याने त्याला दिले नसल्याचे सांगितले. ट्रकच्या चालक, वाहकासह संबंधित पाच जणांवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ५ नुसार गुन्हा दाखल केला.
* शासकीय वस्तीगृहातील महिलेचा मृत्यू