मुंबई / कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केला आहे. ‘मुश्रीफ यांच्या कुटुंबियाने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे 2700 पानाचे पुरावे आहेत, ते मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिले आहेत, असंही सोमय्या म्हणाले. बाप बेटे दोघांच्या 127 कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत, असंही ते म्हणाले.
हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत 2700 पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. मी सोमय्या यांच्यावर फौजदारी 100 कोटींचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. दोन आठवड्यात कोल्हापूर कोर्टात दावा दाखल करणार, असं मुश्रीफ म्हणाले. तसेच सोमय्या यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असंही ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात सोमय्यांनी आरोपांचे सत्र चालूच ठेवली आहे. आधी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.
ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावं किरीट सोमय्यांनी जाहीर केली होती. दुर्दैवाने राखीव नावं आहेत. प्रताप सरनाईक, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अनिल परब, अनिल देशमुख, यांची नावं होती. आता यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे, असं सोमय्या म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियाने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. फक्त तेव्हढचं नव्हे तर बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे 2700 पेजेसचे पुरावे आहेत, ते मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिले आहेत, असं सोमय्यांनी सांगितलं.
बाप बेटे दोघांच्या 127 कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत. हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. 2018- 19 मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. बेनामी ट्राझॅक्शन 127 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर लगेचच मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. बिनबुडाचे आरोप करणे ही सोमय्यांची सवय आहे. त्यांच्या आरोपात तथ्य नाही. मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो असे सांगत किरीट सोमय्या यांची सीए पदवी तरी खरी आहे का याबाबत माझ्या मनात शंका असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
सोमय्या दाखवत असलेली सर्व कागदपत्रे ही इंटरनेटवर उपलब्ध असून ती कागदपत्रे आम्हीच अपलोड केलेली आहे. जर ते सर्व खोटे असते तर आम्हीच ती कागदपत्रे कशी अपलोड केली असती, असे मुश्रीफ म्हणाले. शिवाय निवडणुकीची प्रतिज्ञापत्रे देखील नेटवर उपलब्ध असतात. त्यामुळे सोमय्या यांनी कागदपत्रे गोळा करून आपण काही तरी नवीन करत आहोत, अशी राणा भीमदेवी थाटात जे आरोप केले त्यात काही तथ्य नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.