नागपूर : अल्पवयीन मुलीसोबत तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवणे हाही बलात्कारच होतो, असे हायकोर्टाने स्पष्ट केले. आरोपीने बचाव करण्यासाठी पीडित मुलीच्या सहमतीचा मुद्दा मांडला होता. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही, असा दावा आरोपीने केला. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा मुद्दा फेटाळून लावत अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधास दिलेल्या सहमतीला कायद्यात काहीच महत्त्व नाही, असे निकालात नमूद केले.
घटनेवेळी पीडित मुलगी केवळ फक्त १४ वर्षाची होती. आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले होते. आरोपीने २७ जून २०१६ रोजी तिला पळवून आत्याच्या घरी नेले. मुलीशी लग्न केल्याचे सांगितले. आत्याने त्या ठिकाणी दोन दिवस राहण्याची सोय केली. यातूनच शरीरसंबंध झाले. हे समजल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसाकडे धाव घेऊन गुन्हा दाखल केला.
या निर्णयामुळे चांगल्या-वाईटाची समज नसलेल्या अल्पवयीन मुलींना खाऊचे, इतर आमीष दाखवून वासनेची शिकार बनवणाऱ्या नराधमांना कठोर धडा मिळणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला. अल्पवयीन मुलीसोबत तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवणे हाही बलात्कारच होतो, असे कोर्टाने स्पष्ट करून संबंधित आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निकाल दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरोपीकडून बचाव करण्यासाठी पीडित मुलीच्या सहमतीचा मुद्दा न्यायालयात मांडला होता. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही, असा दावा केला. कोर्टाने हा मुद्दा फेटाळून लावत अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधास दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून काहीच महत्त्व नाही, असे निकालात नमूद केले.
गजानन देवराव राठोड (रा. नेर, जि. यवतमाळ)असे आरोपीचे नाव आहे. २०१८ मध्ये विशेष सत्र न्यायालयाने त्याला मुलीवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून कमाल १० वर्षे सश्रम कारावास व ११ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.
* समोहन तज्ञाकडे गेलेल्या महिलेचा विनयभंग
नाशिक : चिडचिड होत असल्याने समोहन तज्ञाकडे गेलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
संशयीत तज्ञास इसमास पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिपक विजयकुमार मुठाळ (४८ रा.प्रतापसिंग चौक पाथरवट लेन) असे अटक केलेल्या संशयीत तज्ञाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटीतील पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महिलेची नाहक होत होती त्यामुळे तिने समोहन तज्ञांकडे जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या बुधवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास महिला नागचौक परिसरातील संशयीताच्या समोहन केंद्रात गेली असता ही घटना घडली. उपचाराचा बहाणा करीत संशयीत मुठाळ याने महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.