पुणे : भर रस्त्यात तरूणीला मिठीत घेत एका डिलिव्हरी बॉयने किस करण्याचा प्रयत्न केला. अचानक ही कृती घडल्याने तरुणी गोंधळात पडली. या प्रकारामुळे ती खूपच घाबरली. तिने पोलिसांकडे धाव घेत त्या डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.
पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. एका स्वीगी डिलिव्हरी बॉयने भर रस्त्यावर तरुणीचा चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. ही तरूणी रस्त्यावरून जात होती. स्वीगी डिलिव्हरी बॉय अचानक तिच्यासमोर आला. जवळ येऊन त्याने तरुणीला अश्लिल शेरेबाजी केली. तसेच तरुणीला एका हाताने जवळ ओढून मिठी मारुन तिला चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तरुणीने पोलिसांत तक्रार केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पिंपरी चिंचवडमधील वाकड या भागात एका स्वीगी डिलिव्हरी बॉयने तरुणीचे रस्त्यावर चुंबन घेण्याचा प्रयत्न करत केला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी मंगळवारी (14 सप्टेंबर) पिंपरी चिंचवडमधील एका रस्त्यावरून जात होती. मात्र, अज्ञात स्वीगी डिलिव्हरी बॉय अचानकपणे तरुणीसमोर आला. तसेच जवळ येऊन त्याने तरुणीला अश्लिल शेरेबाजी केली. एवढ्यावरच न थांबता डिलिव्हरी बॉयने तरुणीला एका हाताने जवळ ओढून मिठी मारुन तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.
स्वीगी डिलिव्हरी तरुणाचे वय अंदाजे 20 ते 25 वर्षे असावे असे सांगण्यात येत आहे. हा प्रकार घडताच तरुणीने डिलीव्हरी बॉयविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी स्विगी डिलिव्हरी बॉयविरोधात वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस डिलिव्हरी बॉयचा शोध घेत असून तपास सुरु आहे.