सोलापूर : सोलापुरातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात एका रुग्णाने सलाईनच्या लोखंडी रॉड मारून दुसऱ्या एका ७० वर्षीय रुग्णाचा खून केला. ही धक्कादायक घटना १३ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान बी ब्लॉक तिसरा मजल्यावरील मेल सर्जरी वॉर्डात घडली.
याप्रकरणी सौरभ संजय राऊत (वय २७, रा.बी-१ कॉटर, सिव्हिल हॉस्पिटल) यांनी सरकारतर्फे सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून युसुफ मौलाली पिरजादे (वय ३४, रा. तिरंगा नगर, विडी घरकुल, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सिव्हिल हॉस्पिटल येथील बी ब्लॉक मधील तिसरा मजल्यावरील सर्जरी वॉर्डात मयत ७० वर्षीय ण गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून उपचार येत होता. दरम्यान, ११ सप्टेंबर रोजी युसुफ पिरजादे याला फुफुसाचा आजाराबाबत त्याच वॉडत दाखल करण्यात आले.
मयत रुग्ण आणि युसूफ दोघे शेजारी शेजारी बेडवर होते. १३ रोजी दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी वृद्धाला युसूफ याने मुझे इसमें शैतान दिखता है असे म्हणत सलाईनच्या लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली. हे पाहून आजूबाजूच्या रुग्णांनी यावरून आरडाओरड केल्यानंतर सिव्हीलमधील कर्मचाऱ्यांनी जखमी वृध्दाला उपचारासाठी दुसऱ्या वॉर्डात दाखल केले. बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे व सदर बझार पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
घटना उघडकीस आल्यावर नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी भेट दिली. ते म्हणाले की, शहरातील बेघरांची सोय करणे हे महानगरपालिकेचे काम आहे. घरांसाठी राहण्याची सोय करावी, बेघर आजारी पडल्यानंतर जरी शासकीय रुग्णालयात दाखल झाला तरी सुध्दा बेघर रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्याला राहण्याचा आसरा पाहिजे. त्यासाठी महानगरपालिकेने बेघरांसाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे.
या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खुनाच्या प्रकारानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणत नाही. बेघरांच्यामध्ये मोठी दुर्गंधी सुटली आहे. अस्वच्छतेच्या कारणावरूनच दोघा रुग्णांमध्ये वाद झाल्याची चर्चा सिव्हिल परिसरात आहे.
युसूफ पिरजादे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मृताची रात्रीपर्यंत ओळख पटली नव्हती. या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली आहे. तपास पोसई वाघमारे हे करीत आहेत.
* विवाहितेला घरात उपाशी कोंडून छळ; पती सहा जणांवर गुन्हा
सोलापूर : विवाहितेला घरात उपाशी कोंडून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केल्याची घटना दि.१९ जानेवारी ते १९ एप्रिल २०२१ दरम्यान घडली. याप्रकरणी रजिया शफिक शेख (वय-२८,रा. किसान संकुल नगर,सोलापूर) यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती शफिक शेख, अब्दुल सुलतान शेख, रफिक शेख, फातिमा,नशिमा,बिस्मिल्ला (सर्व.रा.सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरील संस्थेत आरोपींनी मिळून फिर्यादी रजिया शेख यांना तुझ्या वडिलांनी लग्नात हुंडा दिला नाही व मानपान केला नाही. तू आता माहेरून पैसे सोने व संसार उपयोगी वस्तू घेण्यासाठी मोठी रक्कम घेऊन ये म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर रजिया शेख यांना घरात उपाशी कोंडून ठेवून शारीरिक व मानसिक त्रास दिला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पवार हे करीत आहेत.