सोलापूर : येथील सिध्देश्वर पेठेत घर जागेच्या वाटणीवरून काका पुतण्यामध्ये तलवारीने हल्ला होऊन एकजण जखमी झाला.
ही घटना सोमवार, 13 सप्टेंबर रोजी घडली. बंदगी हुसेनबाशा सिंदगीकर (वय 35, रा. घर नं.13, ज्ञानगंगा प्रशालेजवळ, बसवेश्वर नगर, नईजिंदगी सोलापूर ) असे जखमीचे नाव आहे. हे त्यांच्या घराच्या वाटणीसाठी जहॉंगीर लालसाब सिंदगीकर यांच्या घरी सिध्देश्वर पेठेत बोलावल्यामुळे गेले असताना जहॉंगीर, जैद जहॉंगिर सिंदगीकर, तलाह सिंदगीकर, अबुबकर सिंदगीकर यांनी घरजागेच्या वाटणीवरून वाद झाल्याने शिवीगाळ करून तलवारीने हल्ला केला त्यात उजव्या कानाला तलवार लागून जखमी झाला त्याचवेळी जलाल व महेबुब शहापुरे यांनाही मारहाण केल्याची फिर्याद बंदगी सिंदगीकर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.
* विवाहितेचा छळ, कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आण
सोलापूर – माहेरून पैसे आण म्हणून सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केला.
फातिमा मजहर शेरदी (वय 20, रा. सरवदे नगर, मुळेगांव रोड सोलापूर) असे पिडीत विवाहितेचे नाव आहे. हिचा विवाह मजहर इरफान शेरदी याच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसापासूनच पती मजहर, सासू शहनाज शेरदी, सासरा इरफान शेरदी, दीर अजहर शेरदी या सर्वजणांनी मिळून लग्नात आमचा मानपान केला नाही तुझे वडील भगोडे आहेत असे म्हणून हाताने मारहाण करून उपाशी ठवेले शिवीगाळ करून शारीरीक व मानसिक छळ केला तसेच आम्हाला कर्ज झाले आहे ते फेडण्यासाठी सोने विकून पैसे आण असे म्हणून तगादा लावून छळ केला, अशी फिर्याद फातिमा शेरदी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.
* मानपान केला नाही म्हणून विवाहितेला मारहाण
सोलापूर – लग्नात आमचा मानपान योग्य पध्दतीने केला नाही म्हणून विवाहितेला तिच्या सासरच्या लोकांनी शारीरीक व मानसिक छळ केल्याची घटना उघड झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राणी तानाजी पुकळे (वय 26, रा. काळेवाडी, मुपो घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर सध्या सरवदे नगर मुळेगांव रोड सोलापूर) असे पिडीत विवाहितेचे नाव आहे. हिचा विवाह तानाजी भाऊ पुकळे याच्याशी झाला होता. लग्नात आमचा मानपान योग्य पध्दतीने केला नाही तुझ्यामुळे आमच्या घरी दरीद्रीपणा आला आहे तुला स्वयंपाक नीट येत नाही असे वारंवार म्हणून पती तानाजी, सासू आकुताई, नणंद प्रियांका चंद्रकांत गावडे, नंदावा चंद्रकांत गावडे, दीर शहाजी पुकळे, सासरे भाऊ पुकळे या सर्वजणांनी मिळून संगनमताने माहेरून पैसे आण असे म्हणून वेळोवेळी शारीरीक व मानसिक छळ केला अशी फिर्याद राणी पुकळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.
* शास्त्री नगरातील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए
सोलापूर – सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्री नगर परिसरात अवैधपणे हातभट्टी दारूचा व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली.
जाकीर उस्मान बिजापुरे ऊर्फ विजापुरे (वय 48, रा. 820, शास्त्री नगर सोलापूर) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याने त्याच्या वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी हातभट्टी दारूचा अवैध व्यवसाय करून दारू ची वाहतुक व विक्री करून तसेच निष्काळजीपणे वाहने चालवून रस्त्यावरील लोकांच्या जिविताला धोका निर्माण केला. नागरीकांना मारहाण करणे दहशत पसरवून सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करीत होता, म्हणून त्याच्या विरूध्द वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. परंतु त्याच्या वर्तुणुकीत सुधारणा होत नव्हती. म्हणून त्याच्या विरूध्द एमपीडीए अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करून त्याला पुण्यातील येरवाडा कारागृहात पाठवण्यात आले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.