सोलापूर : अफगाणिस्तानातील सध्याच्या संघर्षाचा दूरगामी परिणाम पाकिस्तान अस्थिर होण्यात होऊ शकतो. असे झाले तर ती भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरेल असे मत ज्येष्ठ पत्रकार गोपाळ जोशी यांनी व्यक्त केले. जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेत जोशी यांनी ‘अफगाणिस्तानचे वास्तव आणि भारतापुढील आव्हाने’ या विषयावर विश्लेषण केले. व्याख्यानमालेचे यंदाचे ४५ वे वर्ष आहे.
अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाचा फायदा घेऊन चीन तिथे घुसू पाहतो आहे. त्यासाठी एकवेळ पाकीस्तानला बाजूला ठेवावे लागले तरी ते करून अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजवत चीन, अमेरिका, युरोपीय देशांवर अप्रत्यक्षपणे दबाव टाकण्याची महत्वाकांक्षा बाळगून आहे. हे होणे भारतासह अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, जर्मनी यांसह अशा अनेक देशांसाठी धोक्याचे आहे. अफगाणिस्तानात लष्करी कारवाई करा अशी मागणी अमेरिका, युरोप भविष्यात भारताकडे मागणी करू शकतील. मात्र सध्या तटस्थ भूमिका घेतलेला भारत या मागणीचा कसा सामना करतो यावर एकप्रकारे जगाची स्थिरता अवलंबून आहे.
लोहखनिजे आणि इतर साधनसंपत्तीने युक्त असलेल्या अफगाणिस्तान आणि परिसरात वर्चस्व निर्माण करून चीनची भविष्यातील गरज भागविणे हे चीनचे ध्येय आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे त्याला अटका करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात पुन्हा सैन्य उतरविले आहे याचा अर्थ भविष्यात काय होऊ शकते याची कल्पना अमेरिकेला आली आहे.
आजवर भारताने अफगाणिस्तानात तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक गेल्या 20 वर्षांत केली आहे. याचे सकारात्मक परिणाम भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध चांगले असण्यात झाले आहेत. तालिबान सत्तेत येताना इसिसने तालिबानकडे मागणी केली की भारताने केलेली विकासकामे उद्ध्वस्त करावीत. मात्र याकडे तालिबानने केलेले दुर्लक्ष अफगाणिस्तानातील सर्व गटांमध्ये भारताबदद्दल असलेल्या चांगल्या भावनेचे निदर्शक आहे.
जगाच्या बदलत्या राजकारणात मुख्यतः रशिया, चीन, अमेरिका हे देश भारताची भूमिका काय असेल याकडे लक्ष ठेवून आहेत. भविष्यात अफगाणिस्तानात घनघोर संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. यावर उपाय म्हणून भारत, आखाती देशांना एकत्र येऊन नवी भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा दक्षिण आशिया, पश्चिम आशियाला मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागण्याची दाट शक्यता आहे, असेही गोपाळ जोशी म्हणाले. व्याख्यानमाला समिती प्रमुख मदन मोरे यांनी स्वागत केले.