पुणे : पुण्यात गणपती मिरवणुकीला परवानगी नसतानाही ढोल ताशांचा दणदणाट झाला आहे. यावेळी गणपती बाप्पाचा होणारा जयघोष, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत ढोल ताशांच्या गजरात तरुणींनी ठेका धरला. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुक पालखीत बसला आणि तरुणाई बेधुंद होऊन नाचली.
पुण्यात मिरवणुकीला परवानगी नाही हे लक्षात येता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलीसांनी हस्तक्षेप करत ढोल ताशा बंद केेला. ढोल ताशा बंद करताचं कार्यकर्त्यांनी पोलिसांना 50 लोकांना परवानगी दिल्याचं सांगत ढोल ताशा वाजवू देण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी वादकांना अडवले. त्यांनी यास विरोध केला. तसेच ढोल वाजवण्यात येत होता. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताचं ढोल ताशा बंद करत ढोल ताशे ताब्यात घेतले.
ढोल ताशे बंद झाले तरीही गणपती बाप्पा करत तरुणाई हातांच्या टाळ्यावर थिरकत होती. पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा देताचं अवघ्या 10 मिनीटात गणपती बाप्पाचं विसर्जन गजकुंडात करण्यात आलं आणि 1 वाजून 20 मिनीटांनी गणपती विसर्जित केले. कोरोनाला विसरुन कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला. मात्र पोलिसांनी आनंद साजरा करु दिला पण वादकांची नावं लिहून घेतली. पोलीसांनी कारवाई करण्याचा इशारा दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
7 हजार पोलीसांचा बंदोबस्त असूनही सात हजाराहून गर्दी होती. जर या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याला जबाबदार कोण? या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण याबाबत विचारणा होत आहे. यास जबाबदार तुळशीबाग मंडळ की बाहेरून आलेले नागरिक याबाबतही विचारणा होत आहे. याची चौकशी पोलीस आता करतील आणि कारवाई करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तुळशीबाग गणपतीचं विसर्जन करताना कार्यकर्त्यांच्या गर्दीबरोबरच महिलांचीही गर्दी होती. ढोल ताशांच्या गजरात थिरकण्याचंही महिलांनीही राहवलं नाही. तरुणी मनमुराद नाचल्या. एकीकडे कोरोनामुळे मिरवणूका काढण्यास परवानगी दिली नव्हती तर दूसरीकडे बाप्पाला निरोप देण्यासाठी मास्कही तोंडावर पाहायला मिळाला नाही.
* रस्ते बंद असताना नागरिक नेमके कुठून आले ?
कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले हे अध्यक्षांना विचारताचं त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला तर ही गर्दी मंडळाच्या कार्यकर्त्यांची नसून बाहेरून आलेल्या नागरिकांची आहे असं सांगत वेळ मारून नेली मात्र पुण्यात सगळे रस्ते बंद केले असताना नागरिक नेमके कुठून आले? हा प्रश्न आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडे दुर्लक्ष करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला.