पंढरपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भारताची संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी सिंहाचा वाटा आहे. लोककल्याणकारी कामे करीत असताना रणांगणावर शत्रूला सडेतोड उत्तर ही दिले आहे. त्या युद्ध कलेत पारंगत होत्या. आपल्या जीवनात त्यांनी शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचा परिचय दिला आहे. त्यांच्या जीवनातील या दोन्ही बाजू आजच्या युवा पिढीला समजल्या पाहिजेत. राज्यभरातील जनभावनेचा विचार करून आपण विद्यापीठास अश्वारूढ पुतळा भरण्यात यावा अशा सूचना द्याव्यात, अशी मागणी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर आणि आमदार गोपिचंद पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे केली आहे.
आपल्या कार्यकर्तृत्वाने हिंदू संस्कृतीचा स्वाभिमानपुर्न॑स्थापित करणारा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्व म्हणजे “शील आणि शौर्याचा” मिलाप, एका हातात शास्त्र आणि एका हातात शस्त्र घेऊन मासाहेबांनी लोक कल्याणकारी राज्य उभे केले . त्यांच्या या व्यक्तिमत्त्वातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून सोलापूर विद्यापीठाला मासाहेबांचा अश्वारुढ पुतळा बसवण्यात यावा, असा ठराव पहिल्या स्मारक समितीने मंजूर केला होता. परंतु पहिल्या समितीचा ठराव बाजूला सारत व लोकभावनेचा अनादर करत आता नव्याने स्थापन झालेल्या स्मारक समितीने अश्वारूढ पुतळा बसविण्याचे नाकारले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मासाहेबांची शिवपिंडधारी प्रतिमा व पुतळा भारतात अनेक ठिकाणी असल्यामुळे विद्यापीठात मात्र त्यांच्या पराक्रमी बाण्याचे दर्शन घडवणारा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा बसवला पाहिजे अशी आग्रही जनभावना आहे. या विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करत युवक – युवती येतात त्यांच्या संघर्षाला प्रेरणा देण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा करू शकतो अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारा पुतळा उभारला गेला पाहिजे. याविषयी कुणाचंही दुमत असण्याचे कारण नाही परंतु या स्मारक समिती मध्ये राजकीय हेतूने आलेल्या एका व्यक्तीच्या हट्टामुळे अश्वारूढ पुतळ्याच्या मागणीच्या लोभावनेला टाळल जात आहे.
आपण विद्यापीठाचे कुलपती म्हणून विद्यापीठ प्रशासनाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा बसवावा या मागणीसंदर्भात विद्यापीठास सूचना कराव्यात, यावेळी राज्यपाल यांनी जनभावनेचा आदर केला जाईल व उचित कार्यवाही करण्याचे आश्वासित केले आहे, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर , होळकर घराण्याचे वंशज भुषणसिंहराजे होळकर यांनी दिली. यावेळी माऊली हळणवर, सुभाष मस्के उपस्थित होते.