ठाणे : डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी 14 वर्षांची अल्पवयीन आहे. या मुलीवर 30 आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला. या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केलं जात होतं. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी गँगरेप केला. याप्रकरणी आत्तापर्यंत 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. पीडित मुलीच्या प्रियकराने बलात्कार करतानाचा एका व्हिडिओ काढला होता. या व्हिडियोच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी सामूहिक बलात्काराचे दुष्कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे समजते. एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनेवरुन एकमेकांची उणीधुणी काढण्याचं काम सुरू असल्याचं दिसत आहे. तर, दुसरीकडे या घटनांना रोखण्यात प्रशासनाला अपयश असल्याचंही उघड होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवून यावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात पत्रवाद रंगला आहे. यातच आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची भीषण घटना घडली आहे. डोंबिवलीच्या भोपर परिसरातील 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
* आई रागावल्याने तरुणीचा गळफास
घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर : आई रागवण्याचा किरकोळ कारणावरून एका अल्पवयीन तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केली. ही घटना सिन्नुर (ता. अक्कलकोट) येथे काल बुधवारी (ता. 22) सकाळच्या सुमारास घडली.
त्या अल्पवयीन तरुणीने आज सकाळी घरात कोणी नसताना छताच्या लाकडी वाशाला दोरीने गळफास घेतली होती. आजूबाजूच्या लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर तिला फासातून सोडवले. त्यानंतर तिला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.