सोलापूर : किरकोळ कारणावरून एकास शिवीगाळ करत डोक्यात दगड घालून जखमी केल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोदी बोगदा सोलापूर येथे घडली. याप्रकरणी गणेश शिवाजी जाधव (वय-३३,रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर १,सोलापूर) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सुनंदा जाधव,पुनम (पूर्ण नाव माहित नाही) देविदास गायकवाड रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,वरील संशयित आरोपींनी फिर्यादी गणेश जाधव यांना राहते घर सोडून जा, असे म्हणत दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.तसेच त्यानंतर संशयित आरोपी देविदास गायकवाड याने तेथे पडलेला दगड घेऊन गणेश जाधव यांच्या डोक्यात मारून जखमी केले. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक शिवशरण हे करीत आहेत.
* चोरट्याने महिलेच्या हातातील पाटल्या पळविल्या
सोलापूर : एसटी प्रवासात कोणीतरी अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या हातातील ५१ हजार रुपये किमतीचे अडीच तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या चोरून नेल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी शोभा रामचंद्र मोहिते (वय-५८,रा. किसान संकुल अक्कलकोट रोड, सोलापूर) हे सोलापूर ते बार्शी एसटी बस मध्ये प्रवास करीत होते. त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी शोभा मोहिते यांच्या उजव्या हातातील ५१ हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या चोरून नेल्या आहेत. असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक डोके हे करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* शिवीगाळ केल्याच्या कारणावरून ब्लेडने वार
सोलापूर : शिवीगाळ केल्याच्या कारणावरून तरुणास विटा ने व ब्लेडने मारहाण करून जखमी केल्याची घटना २२ ते २३ सप्टेंबर दरम्यान मधुकर उपलब्ध वस्ती सोलापूर येथे घडली. याप्रकरणी सय्यद परशुराम शासम (वय-२२,रा. मधुकर उपलब्ध वस्ती,सोलापूर) याने सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या फिर्यादीवरून हुलगप्पा रामण्णा शासन व जग्गू हुलगप्पा शासम (दोघे.रा.मधुकर उपलब्ध वस्ती, सोलापुर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी याने फिर्यादीची काकी जग्गू हीला फिर्यादीचे आई सरस्वती हिला शिवीगाळ केली असे विचारले. त्यावेळी वरील संशयित आरोपींनी फिर्यादी याला विटाने व ब्लेडने मारहाण करत जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक शिवशरण हे करीत आहेत.
* मोहोळमध्ये तरुणावर तलवारीने हल्ला
सोलापूर : मागील भांडणाच्या वादातून मोहोळमधील क्रांती नगर येथे तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
शैलेश संगम सरवदे (वय २१, रा. क्रांती नगर मोहोळ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर घराजवळील मागील भांडणाच्या वादातून बाळू क्षीरसागर,अवी क्षीरसागर व इतर चारजणांनी तलवारीने पाठीस, हातास, पायास वार करून जखमी केले. त्याला उपचाराकरिता सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद सिव्हील चौकी झाली आहे.