बार्शी : ड्राय डे असतानाही बइर विक्री केल्याप्रकरणी येथील बस स्थानकाशेजारील गोविंद बिअर शॉपीचे मालक स्वप्निल रविंद्र कदम व त्यांचा नोकर लमोविल दिलीप कांबळे याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी पोलिसांनी 11 हजार रुपयांची बिअर जप्त केली. याबाबत पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर प्रभुलिंग घोंगडे यांनी फिर्याद दिली आहे.
स.पो.नि. ज्ञानेश्वर उदार, सपोफौ. अजित वरपे, हवालदार माळी असे गस्त घालत दुपारी 2 वा. बस स्थानक चौकात आले असता त्यांना तुळजापुर रस्त्यावरील एस.बी.आय. बँके समोरील गोविंद बिअर शॉपी मधुन चोरून बिअरची विक्री होत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने ते तिथे गेले असता शॉपीचे शटर जवळ लमोविल कांबळे उभा असलेला दिसला.
त्याने बिअर शॉपी बंद असल्याने आलेल्या ग्राहकास मालक स्वप्निल कदम हा आतुन बिअर देतो व ती बिअर तो पैसे घेवुन ग्राहकांना देतो, असे सांगितले. त्यांनी स्वप्निल कदम यास हाक मारली असता तो लगेच आला. त्याने शॉपी उघडली असता त्यात वेगवेगळ्या कंपनीच्या सुमारे 11,105 रुपयांच्या बिअर असल्याचे आढळून आले. ड्राय डे जाहिर केलेला असताना सुध्दा जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लघंन करून बिअरची विक्री केल्याप्रकरणी त्यांच्या विरूध्द भा.द.वि. कलम 188, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* बार्शीत दिवसाढवळ्या वृध्द मालकाच्या डोळ्यादेखत स्कुटी पळवली
बार्शी : बार्शीत दुचाकीचोरांची हिंमत एवढी वाढली आहे की दुचाकी मालक वृध्द असल्याचा फायदा घेवून दिवसाढवळ्या तो पाहत असतानाही त्यांच्या डोळ्यादेखत स्कुटी पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे दुचाकीमालकाने पाठलाग करुनही त्यास इतरांची वेळीच मदत न मिळाल्याने चोर सापडला नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात नगरपालिका जवळ ही घटना घडली आहे.
तालुक्यातील तांदूळवाडी येथील कल्याण नागनाथ धुमाळ हे 72 वर्षाचे शेतकरी आपल्या सुझुकी कंपनीच्या अँक्सेस स्कुटी (क्रमांक एमएच 13 डीयू 4053) वरुन बार्शी येथे आले हेाते. काम उरकल्यानंतर ते नगरपालिकेजवळ गेले असता ओळखीचे गृहस्थ भेटल्याने स्कुटी बाजूला लावून ते शेजारील टपरीवर चहा घेण्याकरीता थांबले. स्कुटी समोरच असल्याने चावी काढली नव्हती. तेवढ्यात तिथे अंदाजे 40 वर्षाचा एक इसम आला आणि त्याने गाडी चालु केली. धुमाळनी अरे थांब, माझी गाडी असे म्हणेपर्यंत तो समोरील रस्त्याने निघून जावू लागला. त्यांनी चोर चोर असे ओरडले तरी कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. भाड्याने रिक्षा करुन बाळेश्वर नाक्यापर्यंत त्यांनी पाठलाग केला, मात्र दुचाकी पळवून नेण्यात चोर यशस्वी ठरला.
* भावजयीला त्रास देण्याचा जाब विचारल्याने मारहाण
बार्शी : भावजयीला त्रास देण्याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर दोघांना मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील देवगाव (मा.) येथे घडली आहे. याबाबत जखमी दत्तात्रय लक्ष्मण मांजरे याने दिलेल्या फिर्यादीवरुन संदीप तुकाराम मांजरे याच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दत्तात्रय मांजरे हे आपला भाऊ शिवलिंग, भावजय विद्या यांच्यासमवेत राहतात. सुमारे एक महिन्यापासून गावातील सुरेश हरी भाकरे हा विद्या हीस सतत त्रास देत होता.
घरी कोणी नसताना तो घराकडे चकरा मारत होता. विद्या हिने त्याबाबत दत्तात्रय यास सांगिलत्यानंतर तो तिला घेवून सकाळी 08:30 वा.चे सुमारास सुरेश भाकरे याचे घरासमोर गेला. त्यावेळी सुरेश व त्याचे वडील हरी भाकरे हे घरी नव्हते. सुरेशची पत्नी घरी होती. तिने हरी भाकरे यांना बोलावून घेतले. त्यावेळी त्याच्यासोबत गावातील संदीप मांजरे हा आला. त्यास सुरेश भाकरे हा भावजयीला त्रास देतो असे म्हटल्यानंतर त्याने लोखंडी पाईपने दोघांनाही मारहाण केली. यावेळी युवराज मांजरे याने त्यांना सोडविले.