सोलापूर : येथील उत्तर सदर बझार लष्कर परिसरात चार जणांनी मिळून तू वफ्फ बोर्डाच्या अधिकार्याला का भेटला असे म्हणून चाकूने हल्ला करून तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवार दि. 27 सप्टेंबर रोजी घडली. अब्दुल रजाक नजीर अहमद शेख (वय 34, रा. घर नं.252, उत्तर सदर बझार लष्कर फलटन मशीदच्या जवळ सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.
हा त्याच्या घराच्या बाहेर आला असताना ईस्माईल महिबुब शेख, अब्दुल अजीज शेख, ताजोद्दीन आबादीराजे व इतर दोन या सर्वजणांनी मिळून तू वफ्फ बोर्डाच्या अधिकार्यांना भेटायला का गेला आमच्या विरूध्द पोलीसांकडे तक्रार करतो का असे म्हणून डोक्यात चाकू, तलवार आणि काठीने हल्ला करून मारहाण केले तसेच पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे हार ओढले आणि ढकलून दिले अशी फिर्याद अब्दुल रजाक शेख याने सदर बझार पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पोलीसांनी आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.
* दुचाकीवरून पडलेल्या जखमी महिलेचा मृत्यू
सोलापूर : गुरसाळे ( ता. पंढरपूर ) येथे दुचाकीच्या पाठीमागे बसून प्रवास करताना तोल जाऊन खाली पडून जखमी झालेल्या माया कमलाकर चव्हाण (वय४९ रा. करकंब ता. पंढरपूर) या सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना काल शनिवारी रात्री मरण पावल्या. त्या १९ सप्टेंबर रोजी सकाळी दुचाकीच्या पाठीमागे बसून करकंब ते पंढरपूरच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यावेळी हा अपघात घडला. त्यांना पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे. याची सिव्हिल पोलीस चौकीत झाली.
* सोहाळे येथे महिलेस मारहाण
सोलापूर : सोहाळे (ता.मोहोळ) येथे भावकीतील शेतामधील बांधाच्या वादातून दगड आणि काठीने केलेल्या मारहाणीत उर्मिला राजेंद्र बाबर (वय३२) या जखमी झाल्या. ही घटना आज रविवारी सकाळी घडली. त्यांना कामती येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. केशव बब्रुवान बाबर आणि अन्य पाच जणांनी त्यांना मारहाण केली. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* विवाहितेने केले विष प्राशन
सोलापूर : एमआयडीसी परिसरातील निलमनगर येथे, पती बरोबर झालेल्या भांडणाच्या कारणावरून कोमल चंद्रकांत दोमा (वय२७) या विवाहितेने अंगणात सडा मारण्याचे पिवळे विषारी रंग प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केली. ही घटना आज रविवारी सकाळी घडली. तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलिसात याची नोंद झाली आहे.
* रंगभवन चौकात ट्रॅव्हल्स बसने महिलेला चिरडले
सोलापूर : येथील रंगभवन चौकात पायी जाणार्या महिलेला खाजगी ट्रॅव्हल्स बसने भरधाव वेगात येवून चिरडले त्यातच तिचा मृत्यू झाला ही घटना सोमवार दि. 27 सप्टेंबर रोजी घडली.
सुभद्रा विश्वनाथ खरटमल (वय 75, रा. 244, शुक्रवार पेठ, ढोर गल्ली सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला रंगभवन चौकातील सर्कल जवळून जिल्हा परिषदेच्या रस्त्याकडे जात असताना सातरस्ताकडून भरधाव वेगाने आलेल्या एम एच 04, एफ सी 8118 या मिराज टुर्स अॅन्ड टॅ्रव्हल्सच्या खाजगी बस चालकाने जोरात धडक दिली त्यात महिला गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. याबाबत दिपक तुकाराम इंगळे (वय 42, रा. शुक्रवार पेठ ढोर गल्ली सोलापूर ) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस नाईक वाडीकर करीत आहेत.
* सांगलीत मारहाण; जखमी सोलापुरात
सोलापूर : उमदी (ता. जत जि. सांगली) येथे पैशाच्या वादातून बळजबरीने दारू पाजवून दगडाने केलेल्या मारहाणीत महादेव सोमलिंग बिराजदार (वय ४० रा. इंडी जि. विजयपूर) हा गंभीर जखमी झाला. त्याला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात आज रविवारी पहाटे बेशुद्धावस्थेत दाखल करण्यात आले.१९ सप्टेंबरच्या रात्री त्याला जत येथे मारहाण झाली होती, अशी नोंद सिव्हील पोलिसात झाली आहे.