Tuesday, May 24, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापूर भाजप पदाधिका-यांनी राज्यपालांची भेट घेऊन केलेल्या तक्रारीला राष्ट्रवादीचे उत्तर, शरद पवारांच्या सोलापूर दौ-यात बदल

Surajya Digital by Surajya Digital
September 29, 2021
in Hot News, राजकारण, सोलापूर
19
सोलापूर भाजप पदाधिका-यांनी राज्यपालांची भेट घेऊन केलेल्या तक्रारीला राष्ट्रवादीचे उत्तर, शरद पवारांच्या सोलापूर दौ-यात बदल
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महापालिकेतील  सत्ताधिकारी, भाजपाचे महापौर, सभागृह नेते पदाधिकारी व माजी मंत्री, आमदार यांनी काल मंगळवारी  राज्याचे राज्यपाल यांना भेटून  सोलापुरातील विकासकामांबद्दल निवेदन दिले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या बद्दल खोट्या तक्रारी व खोटी माहिती दिली.  तशा आशयाची माहिती प्रसारमाध्यमांतून आली. त्यास आज राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे.

यावर आज सोलापूर शहर राष्ट्रवादी चे पदाधिकारी, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष व गटनेते यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपा नियुक्त राज्यपालांना भेटून सोलापूरच्या विकासाबद्दल निवेदन देणे म्हणजे मनपा मध्ये स्वतः सत्तेवर असताना स्वतः तर कामे करायचेच नाही परंतु शहराच्या विकासाचे राजकारण करत एक स्टंटबाजीचा प्रकार असल्याचा आरोप गटनेते किसन जाधव यांनी केला. राज्यात सध्या महाविकास आघाडीची सत्ता असून जनतेच्या प्रश्नांसाठी सक्षम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे विकासकामांबद्दल निधी मागायचा सोडून, शासनदरबारी जनतेच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करायचा सोडून राज्य सरकार बद्दल मनात द्वेषभावना ठेवून राज्यपालांकडे अशाप्रकारे निवेदन देणे खेदाची बाब असल्याचे सांगितले

काल भाजपाच्या नेते पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांकडे महाविकास आघाडी बद्दल तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री यांनी कोणताच निधी सोलापूरच्या विकासासाठी दिला नसल्याचे खोटेनाटे सांगत तशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्र व प्रसिद्धी माध्यमांना दिल्याचे पहावयास मिळाल्याचे सांगत याबाबतीत सत्यता जनतेसमोर मांडताना जेव्हा जिल्ह्याला प्रथम दिलीप वळसे-पाटील हे पालकमंत्री म्हणून लाभले तेव्हा त्यांनी ९.८६ कोटीचा निधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणासाठी दिल्याचे, तसेच त्यानंतर २०२० मध्ये जेव्हा दत्तात्रय भरणे  पालकमंत्री झाले तेव्हा त्यांनी पहिल्याच डीपीडीसीच्या बैठकीत  २०२०-२०२१ साठी ३३.५४ कोटीचा निधी सोलापूर शहराच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला होता. तसेच सध्याला सोलापुरात महानगरपालिकेमध्ये भाजपचीच गेल्या पाच वर्षापासून सत्ता असून देखील राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासासाठी निधी उपलब्ध झाला नाही. परंतु दत्तात्रय भरणे यांनी सर्व नगरसेवकांना समसमान निधी उपलब्ध करून द्या, तसा ठराव पाठवा, मी त्याला मंजुरी देतो असे सांगितले होते.

परंतु महापालिकेतील भाजपा महापौर, सभागृह नेते यांनी साधे बजेट देखील मांडले नाही, नगरसेवकांना समसमान निधीचा ठराव देखील पारित केला नाही – का तर त्याचे श्रेय पालकमंत्री भरणे यांना मिळेल, भाजपाला जनतेसमोर उघडे पडावे लागेल म्हणून….उलट आता हे भाजपाचे नेते पदाधिकारी राज्यपालांकडे जाऊन पालकमंत्र्यांनी शहराला काहीच नाही दिले असे रडगाणे गाताना दिसून येत असून ही बाब नक्कीच निषेधार्थ असल्याचे सांगितले.

भाजपाचे सध्याचे शहरातले आमदार व माजी मंत्री यांच्या कार्यालयासमोरील रस्ता केवळ झाला नसल्याचे कारण पुढे करत शहरात स्मार्ट सिटीची कामे होत नसल्याचे सांगत राज्यपालांना भेटल्याचे पहावयास मिळाले ही शोकांतिका आहे. मागील काळात भाजपचीच सत्ता  (मनपा मध्ये अजून देखील) असताना स्मार्ट सिटी मधील भाजपाच्या नगरसेवक व मक्तेदार यांच्या कामाची बिले मिळत नाहीत म्हणून भाजपानेच स्मार्ट सिटी कार्यालयासमोर आंदोलन करणे ही शरमेची बाब जनतेला पहावयास मिळाली आहे.  महानगरपालिकेमध्ये स्वतः सत्तेत असून महापौर यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी प्रशासनावर अंकुश ठेवून कामे करायला पाहिजे होती परंतु मक्तेदारांची बिले मिळविण्यासाठी उपोषणाला बसलेले दिसून येत आहेत.

परवाच्या 25 तारखेच्या महापालिका सभामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर मध्य साठी 25 कोटीचा निधी महापालिका व पीडब्ल्यूडी ला वितरित केल्याचे सांगत गटनेत्यांनी त्याबद्दल अभिनंदनाचा ठराव देखील महापालिकेत मांडल्याचे नमूद केले असून या निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी मनपा आयुक्तांना, PWD अधिकाऱ्यांना विनंती करणार असल्याचे सांगितले. तसेच विकास कामांच्या उद्घाटन वेळी नामफलकावर उपमुख्यमंत्री यांचा नामोल्लेख असावा हे देखील विनंतीपूर्वक सांगणार असल्याचे म्हटले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शहरातील भाजपा नेते पदाधिकारी यांनी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री यांच्या बद्दल देखील राज्यपालांकडे विनाकारण खोट्या गोष्टी सांगितल्याची बाब निंदनीय असल्याचे कार्याध्यक्ष संतोष  पवार यांनी सांगत पालकमंत्री भरणे मामा यांनी जनतेच्या प्रश्नासाठी लॉकडाऊन असताना कोरोनाच्या गंभीर काळात अनेक हॉस्पिटल चालू करायला लावले, तसेच स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विविध हॉस्पिटल येथे दाखल करोना रुग्णांना भेटी दिल्या, त्यांना दिलासा देत राज्य प्रशासन तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

मनपामधील सत्ताधाऱ्यांनी केलेला खोटा आरोप खोडून काढताना सोलापूर शहर जिल्हा सध्या लसीकरणाच्या बाबतीत राज्यात पहिल्या चारमध्ये असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोरामणी येथील कार्गो विमानतळासाठी मंजूर केलेला ५० कोटीचा निधी तसेच शहरातील महिला जिल्हा रुग्णालयासाठी दिलेला १४ कोटी निधीची मंजुरी असे जवळपास १०० कोटीचा निधी शहराला दिल्याचे सांगितले.

करोना काळात जेव्हा भाजपाचे नेते पदाधिकारी घरी बसले होते तेव्हा पालक मंत्री स्वतः शहरात फिरत होते. अगदी महापौर ह्या कुटुंबासह रुग्णालयात दाखल होत्या त्याचे देखील पालकमंत्री भरणेंनी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. परंतु आता हेच पदाधिकारी पालकमंत्र्यांवर विनाकारण खोटे आरोप करत आहेत.

गेली जवळपास साडेचार वर्षे मनपा मधील सत्ताधारी भाजपा नेते, पदाधिकारी हे मनपा बजेट असेल वा स्थायी समिती चा विषय, शहरातील रस्ते, खड्डे, पाणीपुरवठा, स्मार्ट सिटीच्या कामाच्या बाबतीत सपशेल फेल ठरलेले आहेत.  येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या साठी पुन्हा एकदा जनतेच्या समोर मतदान मागण्यासाठी जावे लागणार असल्यामुळे व त्या वेळेला जनतेने विकास कामांच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी काहीच नसल्याने जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल म्हणून हे काल राज्यपालांना भेटून आपले अपयश झाकण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करत आहेत. परंतु जनता आता भाजपाच्या भूलथापांना बळी पडणार नसून सोलापुरातील जनता नक्कीच सत्ता बदल करेल असे वाटते.

* शरद पवारांच्या सोलापूर दौ-यात बदल

तसेच येत्या ९ ऑक्टोबर रोजी देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार  हे एक दिवसीय दौऱ्यावर सोलापूरला येणार होते. मात्र आता एक दिवस अगोदर ८ अॉक्टोबरला येणार असल्याचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी सांगितले. या दौऱ्यात शरद पवार हे शहरातील प्रमुखांशी सकाळी काही वेळ चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारच्या वेळेस जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी यांचे समवेत व त्यानंतर शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्या समवेत मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटने बाबतीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Tags: #NCP #BJP #office #complaint #Governor #SharadPawar's #visit #Solapur#भाजप #पदाधिका-यांनी #राज्यपाल #भेट #तक्रारी #राष्ट्रवादी #उत्तर #शरदपवारांच्या #सोलापूर #दौ-यात #बदल
Previous Post

मोहोळमध्ये दहा वर्षाच्या मुलाचे अपहरण, बार्शीत परप्रांतीय ठेकेदाराला मारहाण

Next Post

मराठवाड्यात पावसाचा कहर, सप्टेंबर महिन्यात 71 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 436 जणांचा बळी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
मराठवाड्यात पावसाचा कहर, सप्टेंबर महिन्यात 71 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 436 जणांचा बळी

मराठवाड्यात पावसाचा कहर, सप्टेंबर महिन्यात 71 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 436 जणांचा बळी

Comments 19

  1. Sidney says:
    5 months ago

    Thanks in favor of sharing such a fastidious opinion, piece of writing is fastidious, thats
    why i have read it fully

  2. Merri says:
    5 months ago

    I do consider all of the concepts you have presented on your post.They’re very convincing and will definitely work.Still, the posts are too quick for starters. May you please prolong them a bitfrom next time? Thank you for the post.

  3. Jill says:
    5 months ago

    I’m gone to say to my little brother, that he should also visit this weblog on regular
    basis to get updated from most recent gossip.

  4. Darryl says:
    5 months ago

    Everyone loves what you guys are up too. This kind of clever work and exposure!Keep up the good works guys I’ve incorporated you guys to my personal blogroll.

  5. Jason says:
    5 months ago

    If you desire to increase your familiarity only keep visiting this site and be updated with the most up-to-date gossip posted here.

  6. Porfirio says:
    5 months ago

    I love looking through an article that will make men and women think.Also, many thanks for allowing me to comment!

  7. Fabian says:
    5 months ago

    Hi there everyone, it’s my first visit at this web site, and paragraph is
    truly fruitful in support of me, keep up posting such articles.

  8. Adrienne says:
    5 months ago

    After checking out a number of the blog articles
    on your web site, I really appreciate your technique of blogging.
    I added it to my bookmark webpage list and will be checking
    back soon. Please visit my website as well and let me know your opinion.

  9. Warren says:
    5 months ago

    Hi there would you mind stating which blog platform you’re using?
    I’m planning to start my own blog soon but I’m having a hard time deciding between BlogEngine/Wordpress/B2evolution and Drupal.
    The reason I ask is because your layout seems different then most blogs
    and I’m looking for something completely unique.
    P.S My apologies for getting off-topic but I had to ask!

  10. Dollie says:
    5 months ago

    I pay a quick visit daily a few websites and blogs to read posts, except this blog providesfeature based content.

  11. Charlene says:
    5 months ago

    You should take part in a contest for one of the most useful sites online.
    I am going to highly recommend this blog!

  12. Loura says:
    5 months ago

    Admiring the time and energy you put into your blog and detailed information you offer.It’s nice to come across a blog every once in a whilethat isn’t the same out of date rehashed material.Fantastic read! I’ve saved your site and I’m adding your RSS feeds to my Google account.

  13. Jewell Lebrecht says:
    5 months ago

    Ahrefs account for just $15, semrush account for just $10, Adsply account

  14. Cesar Fernatt says:
    4 months ago

    There are a few fascinating time limits here however I don’t determine if I see all of them center to heart. There is some validity however I most certainly will take hold opinion until I look into it further. Good article , thanks and now we want extra! Put into FeedBurner as properly

  15. Sheena Bynon says:
    3 months ago

    I’ve learn some excellent stuff here. Definitely value bookmarking for revisiting. I wonder how so much attempt you place to make this sort of great informative site.

  16. the best salt lamp says:
    3 months ago

    Thank you so much for giving my family an update on this issue on your web-site. Please realise that if a brand new post appears or if perhaps any adjustments occur to the current post, I would be interested in reading a lot more and focusing on how to make good use of those strategies you reveal. Thanks for your efforts and consideration of other people by making this web site available.

  17. Bryan Wirtjes says:
    3 months ago

    Its superb as your other content : D, regards for putting up.

  18. למכור גנרטור says:
    2 months ago

    You actually make it seem so easy with your presentation but I find this matter to be actually something which I think I would never understand. It seems too complicated and extremely broad for me. I’m looking forward for your next post, I will try to get the hang of it!

  19. slot999 says:
    2 months ago

    720996 587390I agree with you. I wish I had your blogging style. 552853

वार्ता संग्रह

September 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Aug   Oct »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697