मुंबई : अखेर मुंबईतल्या शाळा सुरू करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिली आहे. त्यानुसार 4 ऑक्टोबरपासून मुंबईत आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या नियमावलीनुसार एकदिवसाआड शाळा भरतील. तसेच विद्यार्थ्यांना पालकांची संमती असेल तरच शाळेत प्रवेश मिळेल. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल. मास्क बंधनकारक आहे.
मुंबईतील शाळा तब्बल दीड वर्षांच्या कालावधीनंतर सुरु करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यातील आणि मुंबईतील शाळा सुरु करण्याची परवानगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर मुंबईतील शाळा या एद दिवसाआड सुरु करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही याचा निर्णय पालकांनी घ्यायचा आहे. पुर्ण क्षमतेने विद्यार्थी शाळेत येणार असतील तर दोन सत्रांत शाळा सुरु करण्यात येणार असून एका बेंचवर एक विद्यार्थी तर एका वर्गात केवळ १५ ते २० असे आसनक्षमतेच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना बसवण्यात येणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
मुंबईतील सर्व शाळा येत्या ४ ऑक्टोबरला सुरु करण्यात येत असून पाललकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्यात येणार असल्याचे पेडणेकर यांनी म्हटलं आहे. पालकांनी शाळेशी आणि शाळा व्यवस्थापनाशी संपर्क करावा, जेणेकरुन संमीत पत्र मिळेल ते भरुन शाळेत जमा करावे. तेव्हा विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्यात येईल. तसेच ज्या शाळा सुरु होणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच ज्या महानगरपालिकेच्या शाळा आरोग्य सेंटरला कनेक्ट राहतील, ज्या शाळा खासगी आहेत, त्यांनी महानगरपालिका आरोग्य सेंटरशी कनेक्ट राहाव अन्यथा खासगी आरोग्य सेंटरशी कनेक्ट राहणे गरजेचे आहे. एखाद्या विद्यार्थ्याला सर्दी खोकला झाल्याची लक्षणे दिसल्यास त्याला रुग्णालयात नेले पाहिजे, आरोग्याची काळजी घेणे त्याची लक्षणे, विद्यार्थ्यांवर शाळा प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
सुरक्षितता आणि दक्षता घेणे गरजेचे आहे. शाळेत ५० विद्यार्थी असतील आणि सर्व विद्यार्थ्यांना घरुन परवानगी मिळाली तर त्यांना दोन सत्रात बोलवण्यात येईल एका बाकावर एक विद्यार्थी बसवण्यात येईल. विद्यार्थ्याला मास्क, सॅनिटायझर देऊ परंतु विद्यार्थ्यांसोबत एक अधिक मास्क आणि सॅनिटायझर ठेवावे असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. शाळेत शिक्षक आहेत त्यातील ८ वी ९ वी १० वीच्या शिक्षकांचे कोरोना लसीकरण पुर्ण झालं आहे. तर इतर शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. उर्वरित शिक्षकांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन पेडणेकर यांनी सर्व शिक्षकांना केलं आहे.
* शाळा सुरु संदर्भात ठकळ मुद्दै
– शाळा व्यवस्थापन समिती पालकांच्या संमतीसाठी अर्ज दिला जाईल. पालकांच्या संमतीपत्रानंतर त्यांच्या मुलांना शाळेत घेतले जाईल.
– एका बेंचवर एकच मुलगा बसेल. मुलांना मास्क, सॅनिटायझर पालिका देईल.
– सर्व शिक्षकांचे डोस पूर्ण झालेत
– एखाद्या वर्गातील सर्वच मुलांच्या पालकांनी संमती दिल्यास, असे वर्ग अल्टरनेट डे चालवले जातील
– एकूण २९ मुलांना कोरोनाची लागण झालीय.यात केईएमचे २३ विद्यार्थी आहेत. ऊर्वरीत विद्यार्थी हे इतर मेडिकल कॉलजचे आहेत. सौम्य लक्षणे असलेल्यांना क्वारंटाईन केलंय. तर लक्षणे असणा-यांना एडमिट केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम घेतल्याचे समजतंय
– सर्वांचे मत घेतल्यानंतर शाळा सुरू केल्या जातायत.
– मुलांची हजेरी सक्तीची केली जाणार नाही