सांगली : अफझलखान वधाच्या पोस्टरवरून मिरज शहरामध्ये २००९ दरम्यान जातीय दंगली झाली होती. या प्रकरणातील १०६ जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली आहे. तेव्हा गणेशोत्सवादरम्यान ही जातीय दंगल झाली होती.
मिरज दंगलीचे पडसाद विधानसभा निवडणुकीतही उमटले होते. ठाकरे- पवार सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. त्यानंतर हा खटला निकाली काढत न्यायालयाने १०६ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
गणेशोत्सवादरम्यान शिवसेनेकडून मिरज शहरामध्ये अफजलखान वधाचे पोस्टर उभारले होते. त्यावर लिहिलेल्या विधानानंतर मिरज शहरामध्ये जातीय दंगल भडकली होती. दहा ते पंधरा दिवस शहर दंगलीत धगधगत होते. याचे पडसाद सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले होते. मिरज-सांगलीमध्ये पंधरा दिवस कडक संचारबंदी लागू होती. या दंगली प्रकरणी सांगली महापालिकेचे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, मिरज शिवसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या १०६ जणांहून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले होते.
सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या दंगलीचा खटला सुरू होता. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने हा खटला बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयाने खटला बरखास्त केला. तसेच १०६ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती बचाव पक्षाच्या वकील बिलकीस बुजरूक यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दंगली प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्यावरदेखील गुन्हे दाखल झाले होते. मात्र, २०१७ मध्ये तत्कालीन युती सरकारकडून हे गुन्हे मागे घेत चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, भाजपचे सरचिटणीस मकरंद देशपांडे यांची निर्दोष मुक्तता केली होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिरज दंगलीचे पडसाद उमटले होते. सर्वाधिक परिणाम सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात झाला होता. दंगलीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जातीय ध्रुवीकरण होऊन अनेक प्रस्थापित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा पराभव झाला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीचे ५ ते ६ विद्यमान आमदारांचा पराभव झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुपडा साफ करत शिवसेना आणि भाजपचे उमेदवार जिंकून आले होते.
गणेश उत्सवाच्या दरम्यान ही जातीय दंगली घडली होती. ज्यानंतर या दंगलीचे पडसाद त्यावेळच्या विधानसभा निवडणूकीतही उमटले होते. सध्याच्या आघाडी सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आल्यानं न्यायालयानं हा खटला निकाली काढत, निर्दोष मुक्तता केली आहे.
या दंगली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली महापालिकेचे तत्कालीन महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, मिरज शिवसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या १०६ जणांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या दंगलीचा खटला सुरु होत, दरम्यान दोन महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारकडून हा खटला बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता.
* पिसाळलेल्या कुत्र्याचा २५ जणांना चावा
सांगली : सांगलीच्या मिरज येथील पिसाळलेल्या कुत्र्याने सुमारे २५ जणांना चावा घेऊन जखमी केले. या सर्वांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात जाऊन लस घ्यावी लागली. हे पिसाळलेले कुत्रे अद्यापही मोकाट आहे. त्याला पकडण्यासाठी आरोग्य विभाग त्या कुत्र्याचा शोध घेत आहे. दरम्यान, या कुत्र्याने ब्राह्मणपुरी, दिंडी वेस, मालगाव वेस, कमान वेस, सांगलीकर मळा, गणेश तलाव या परिसरात धुमाकूळ घातला.
दरम्यान ग्रामस्थांनी परिसरात असलेले चिकन दुकानदार त्यांच्या दुकानातील कचरा उघड्यावर, शेतात आणून टाकत असल्याने परिसरात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने चिकन दुकानदारांना समज द्यावी. तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.