Thursday, June 1, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

लेहमध्ये लावण्यात आला जगातील सर्वात मोठा एक हजार किलोचा ‘तिरंगा’, पहा व्हिडिओ

Surajya Digital by Surajya Digital
October 2, 2021
in Hot News, देश - विदेश
0
लेहमध्ये लावण्यात आला जगातील सर्वात मोठा एक हजार किलोचा ‘तिरंगा’, पहा व्हिडिओ
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त लेहमध्ये 225 फूट लांब आणि 150 फूट रुंद भारतीय राष्ट्रध्वज लावण्यात आला. याचे उद्घाटन लडाखचे उपराज्यपाल आर. के. माथूर यांनी केले. 1000 किलो वजनाचा तिरंगा हा खादीपासून बनलेला जगातील सर्वात मोठा भारतीय राष्ट्रध्वज आहे. लडाखच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी भारताचे सर्वात प्रिय आणि प्रेरणादायी नेते महात्मा गांधी यांची 152 वी जयंती साजरी केली जात आहे. मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना लाखो भारतीयांनी प्रेमाने ‘बापू’ म्हटले होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला.

राजधानी दिल्लीतील राज घाट येथे त्यांचे स्मारक स्थळ असलेल्या महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्षांसह सर्व नेते पोहोचले. येथे प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. देशाच्या विविध भागांमध्ये असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याचबरोबर एक सामान्य भारतीय सोशल मीडियाद्वारे बापूंची आठवण काढत आहे.

It is a moment of great pride for 🇮🇳 that on Gandhi ji's Jayanti, the world's largest Khadi Tiranga is unveiled in Leh, Ladakh.

I salute this gesture which commemorates Bapu's memory, promotes Indian artisans and also honours the nation.

Jai Hind, Jai Bharat! pic.twitter.com/cUQTmnujE9

— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 2, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, खादीपासून बनवलेल्या जगातील सर्वात मोठ्या भारतीय राष्ट्रध्वजाचे लडाखच्या लेह शहरात अनावरण करण्यात आले. लडाखचे उपराज्यपाल आर के माथूर यांच्या हस्ते ध्वजाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे उपस्थित होते. खादीचा हा राष्ट्रीय ध्वज 225 फूट लांब आणि 150 फूट रुंद आहे. तिरंग्याचे वजन एक हजार किलो आहे. हे भारतीय सैन्याच्या 57 अभियंता रेजिमेंटने बांधले होते. सर्वात मोठा खादीचा तिरंगा डौलाने फडकत आहे. हा एक हजार किलो वजनाचा राष्ट्रध्वज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली. पूज्य बापूंचे जीवन आणि आदर्श देशाच्या प्रत्येक पिढीला कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देत राहतील, असे म्हटले आहे.

 

Tags: #world's #largest #thousandkg #tiranga #planted #Leh #video#लेह #जगातील #सर्वातमोठा #हजारकिलोचा #तिरंगा #व्हिडिओ
Previous Post

शिरभावी येथे चार हजाराचे चंदन जप्त, अत्याचाराप्रकरणी दोन लॉजचे व्यवस्थापक झाले सहआरोपी

Next Post

पोस्टल तिकिटाच्या माध्यमातून सोलापूरातील चार हुतात्म्यांचा इतिहास जगासमोर येईल

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पोस्टल तिकिटाच्या माध्यमातून सोलापूरातील चार हुतात्म्यांचा इतिहास जगासमोर येईल

पोस्टल तिकिटाच्या माध्यमातून सोलापूरातील चार हुतात्म्यांचा इतिहास जगासमोर येईल

वार्ता संग्रह

October 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Sep   Nov »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697