मुंबई : मुंबईतील ड्रग्ज रॅकेट्स वाढतच चालले आहे. एनसीबीने काल रात्री समुद्रातील एका क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. याप्रकरणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. त्यामुळे त्याला अटक होण्याची शक्यता आहे. तसेच, आर्यनचे मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपुर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा यांचीही चौकशी सुरू आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत क्रूझवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकला. यामध्ये १० जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जही जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा समावेश आहे, असे वृत्त इंडिया टुडे या वाहिनीने दिले आहे. पण NCB ने आर्यन खान याला अजून अटक केलेली नाही, त्याला या पार्टीमध्ये येण्याचे निमंत्रण देण्यात आले होते, अशी देखील माहिती या वृत्तामध्ये देण्यात आली आहे NCB सध्या आर्यन खान याची चौकशी करत आहे असेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान आर्यन खानचं ड्रग्ज प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर शाहरुख खानने केलेल्या एका वक्तव्याची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर रंगली आहे. माझ्या मुलाने ती सगळी वाईट काम करावीत जी मी माझ्या तरुणपणी करु शकलो नाही, असं शाहरुख खान याने एका जून्या मुलाखतीत म्हटलं होतं. आता ही मुलाखत व्हायरल होऊ लागली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आर्यन मोठा झाला की त्याने मुलींना डेट करावे, ड्रग्स आणि सेक्स या गोष्टींचा देखील अनुभव घ्यावा. ज्या गोष्टी मी माझ्या तरुणपणी करु शकलो नाही त्या सर्व गोष्टींचा अनुभव त्याने घ्यावा. आर्यनने एक बॅड बॉय बनायला हवे आणि जर तो गूड बॉयसारखा वागू लगाल तर मी त्याला घरा बाहेर काढेन, असे शाहरुख हसहत म्हणाला होता. पुढे तो विनोद करत म्हणाला, माझी एक इच्छा आहे आर्यने अनेक मुलींना त्रास द्वावा. त्या मुलींचे पालक माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे, असं वक्तव्य शाहरुख खानने केलं होतं.
एनसीबीने रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आता थोड्याचवेळात या सगळ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली जाईल. त्यानंतर आर्यन खानसह आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना किला कोर्टात हजर करण्यात येईल. यावेळी आर्यन खानची रवानगी पोलीस कोठडीत होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहक, नुपूर आणि गोमित हे दिल्लीचे रहिवासी आहेत. मोहक एक फॅशन डिझायनर आहे तर नुपूर देखील या व्यवसायाशी संबंधित आहे. नुपूर हा दुसरी आरोपी गोमितसोबत मुंबईत आली होती. गोमित हेअर स्टायलिस्ट आहे. ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्ली येथील ड्रग तस्कर आहेत. या पार्टीत प्रवेशासाठी प्रत्येक व्यक्तीने 80 हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती.