सोलापूर : उंदरगाव (ता.माढा) येथे सशस्त्र दरोडेखोरांनी शाळेतील एका लिपिकाच्या आतून बंद असलेल्या घराच्या दरवाजा तोडून चाकूचा धाक दाखवीत रोख रकमेसह २ लाख १९ हजाराचे दागिने लुटले. त्यानंतर याच दरोडेखोरांनी गावातील दोघांची घरे फोडून रोख रकमेसह ७० हजाराचा ऐवज पळविला. हा धाडसी थरार काल रविवारी पहाटेच्या सुमारास घडला. या तिन्ही ठिकाणच्या घटनेत दरोडेखोरांनी तीन लाखाचा ऐवज लुटून गेल्याची नोंद माढा पोलिसात झाली आहे.
उंदरगाव ( ता. माढा) येथे अच्युत तांबिले हे शाळेतील लिपीक राहण्यास आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आपल्या कुटुंबीयांसमवेत घरात झोपले होते. रविवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास चौघा दरोडेखोरांनी त्यांच्या घराचा आतून बंद असलेला दरवाजा धक्का मारून तोडून आत प्रवेश केला. आणि चाकू तसेच काठीने ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांचा पत्नीच्या अंगावरील ४५ ग्रम सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले. कपाटातील रोख ५० हजार रुपये आणि चांदीच्या वस्तु आदी २ लाख१८हजाराचा ऐवज लुटून पोबारा केला.
हा प्रकार घडल्यानंतर याच दरोडेखोरांनी गावातील स्वप्नील विजय तांबिले यांच्या उघड्या घरातून रोख रकमेसह ५० हजाराचे दागिने पळविले आणि जवळच राहणाऱ्या सुमन नाईकवाडे यांच्या घरातून अशाच पद्धतीने १८ हजाराचा ऐवज चोरून पसार झाले. या घटनेची फिर्याद अमिता अच्युत तांबिले (वय ४८ रा.उंदरगाव) यांनी माढा पोलिसात दाखल केली. पुढील तपास फौजदार शेख हे करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* सासू-सासर्याच्या भांडणामध्ये आल्यामुळे सूनेला कात्रीने भोसकले
बार्शी : बायकोबरोबर भांडताना सून मध्ये आल्यामुळे सासर्याने सूनेला कात्रीने भोसकल्याची घटना शहरातील 422 वसाहतीमध्ये घडली आहे. याबाबत सासू सुनिता राम गजघाटे (रा. 422 वसाहत, गाडेगाव रस्ता,कल्याण किराणा दुकानाच्या पाठीमागे, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सासरा हारुण सय्यदअली पटेल याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुनिता हिचा हारुण पटेल बरोबर प्रेमविवाह झालेला आहे. त्यांना मुलगा अमर, सुन अर्चना व नात त्रिशा असे एकत्रित राहणेस आहेत. हारुण पटेल बांधकाम मिस्त्री असून त्यास दारु पिण्याचे व्यसन असल्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडण होतात. सकाळी साडेनऊ वाजणेचे सुमारास त्या सूनेसह घरातील कामात व्यस्त असताना हारुण पटेल याने बाहेरुन घरी येऊन तु तुझ्या भावाच्या घरी का गेलीस असे म्हणुन त्यांच्याशी वाद घालुन हाताने, लाथाबुक्यांने मारहाण करण्यास सुरुवात केली.
ही मारहाण पाहून सुन अर्चना ही भांडण सोडवणे करिता मध्ये आली असता तु आमचे भांडण सोडवणे करीता का आली? तुला जिव मारतो असे म्हणून शेजारील शिलाई मशीन वरील कात्री घेऊन अर्चना हिचे पोटात भोसकली व तुलाही जिवे ठार मारतो, असे म्हणुन त्यांच्या हातावर कात्रीने मारले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.