नवी दिल्ली : मणिपूरमध्ये ड्रोनद्वारे कोरोना लसीचे वितरण करण्यात आले. मणिपूरमधील विष्णुपूर ते करंगपर्यंत रस्त्याने 26 किमी अंतर हवाई मार्गाने 15 किमी झाले आणि फक्त 12-15 मिनिटांत ICMR ने लस दिली. तसेच लोक टाक सरोवरातून, करंग बेटावर ड्रोनद्वारे लस यशस्वीरित्या वितरित केली गेली.
भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत, जीवनरक्षक औषधे याद्वारे दिली जाऊ शकतात. असं आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. पहिल्यांदाच देशात ड्रोनद्वारे कोरोना लसीचे वितरण करण्यात आलं आहे. भारतातील मणिपूर राज्यातून याची सुरुवात झाली. दक्षिण पूर्व आशियामध्ये प्रथमच ड्रोनचा व्यावसायिक वापर करण्यात आला. मणिपूरमधील विष्णुपूर ते करंगपर्यंत रस्त्याने 26 किमी अंतर हवाई मार्गाने 15 किमी झाले आणि फक्त 12-15 मिनिटांत ICMR ने लस दिली. ICMR ने मणिपूरच्या लोक टाक सरोवरातून, करंग बेटावर ड्रोनद्वारे लस यशस्वीरित्या वितरित केली. हे पूर्णपणे मेड इन इंडिया ड्रोन आहे.
मणिपूरच्या करांग भागात सुमारे 3500 लोकसंख्या आहे. यामध्ये 30% लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. आगामी काळात मणिपूरच्या आणखी दोन जिल्ह्यांमध्ये अशा ड्रोनच्या मदतीने लस देण्याची योजना आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आता 100 कोटी डोसचा आकडा लवकरच पूर्ण होणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, प्रथमच दक्षिण पूर्व आशियात ड्रोनचे व्यावसायिक उड्डाण झाले आहे. यासाठी ICMR, मणिपूर सरकार, तांत्रिक कर्मचारी यांचे अभिनंदन. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मणिपूरच्या करंग क्षेत्राची लोकसंख्या सुमारे 3500 आहे, ज्यात 30% लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आगामी काळात मणिपूरच्या आणखी दोन जिल्ह्यांमध्ये अशा ड्रोनच्या मदतीने लस देण्याची योजना आहे.
ड्रोनद्वारे सोमवारपासून लस पुरवली जात आहे. भविष्यात आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत, जीवनरक्षक औषधे याद्वारे दिली जाऊ शकतात. कीटकनाशक आणि युरियाची फवारणीदेखील यातून केली होऊ शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व अडचणी आणि चढउतारांचा सामना करुन भारत लवकरच 100 कोटी डोसचा आकडा पार करणार असल्याचे सांगितले.
ड्रोनद्वारे कोरोना लस पाठवण्यास सोमवारपासून सुरूवात झाली. वास्तविक, आरोग्य कर्मचाऱ्यांना डोंगराळ आणि दुर्गम भागात ही लस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो, परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे ते आता खूप सोपं होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात ड्रोन धोरण जाहीर केले होते. दक्षिण आशियात प्रथमच ड्रोनचे व्यावसायिक उड्डाण झाले आहे. ही लस मणिपूरमधील बिष्णुपूर येथून करंग आरोग्य केंद्र, लोकटक तलाव, मणिपूर येथे ड्रोनद्वारे पोहोचवण्यात आली. हे अंतर अवघ्या 15 मिनिटांत पार केले.