जेरुसलेम : इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये उत्खननात एक पुरातन काळातलं टॉयलेट सापडलं आहे. सुमारे 27 हजार वर्षांपूर्वीचं हे टॉयलेट असून ते अति श्रीमंत व्यक्तीनेचं बांधलं असण्याचा अंदाज संशोधकांकडून व्यक्त केला जात आहे. हे टॉयलेट बसायला सुटसुटीत असून मलमुत्र वाहून नेण्यासाठी खोल खड्डा आहे. त्यानंतर खाली सेप्टिक टँकदेखील आढळून आला आहे. या टँकमध्ये जनावरांची हाडं आणि काही भाड्यांचं अवशेषदेखील मिळाले आहेत.
सध्या इंडियन आणि वेस्टर्न हे टॉयलेटचे दोनच प्रकार सर्वांना ठावूक आहेत. मोदी सरकारच्या स्वच्छ भारत योजनेमुळे गेल्या काही वर्षांपासून घरोघरी टॉयलेट बांधायला सुरुवात झाली आहे. अजूनही अनेक ठिकाणी नागरिक शेतात किंवा मोकळ्या मैदानावर शौचासाठी जातात. त्यामुळे काही हजार वर्षांपूर्वी सगळेच नागरिक उघड्यावर शौच करत असावेत, असंच सर्वांना वाटतं आहे. मात्र इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये असं नव्हत हे या सापडलेल्या एका पुरातन टॉयलेटवरुन सिद्ध होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जेरुसलेम या ऐतिहासिक शहरात सतत उत्खननाचे काम सुरु असतं. वेगवेगळ्या काळातील संस्कृतींचा अभ्यास त्यातून केला जातो. या उत्खननात नुकतंच एक टॉयलेट सापडलं आहे. सुमारे 27 हजार वर्षांपूर्वीचं हे टॉयलेट आहे. हे टॉयलेट अति श्रीमंत व्यक्तीनंच बांधलं असण्याचा अंदाज संशोधक व्यक्त करत आहेत.
श्रीमंतांचं टॉयलेट 27 हजार वर्षांपूर्वी ज्या प्रकारचं टॉयलेट बांधण्यात आलं आहे. त्यावरून ते कुणाही गरिबाला बांधणं शक्य नसल्याचं दिसतं. प्रचंड खर्च करून आणि अनेक मजुरांच्या मेहनतीनं हे टॉयलेट बांधल्याचं दिसतं. हे एक मोठं न्हाणीघर असून टॉयलेट हा त्याचाच एक भाग आहे. ज्या ठिकाणी हे टॉयलेट सापडलं तिथं एक भलीमोठी राजवाड्यासारखी इमारत होती.
तिथं राहणाऱ्या एखाद्या शौकीन श्रीमंतानं हे टॉयलेट बांधलं असण्याची शक्यता आहे. हे मोठी बातमी: शाळेत घुसून दहशतवाद्यांचा गोळीबार, दोन शिक्षकांचा मृत्यू कसं आहे टॉयलेट बसायला सुटसुटीत असं हे टॉयलेट असून मलमूत्र वाहून नेण्यासाठी खोल खड्डा खणल्याचं दिसतं. त्यानंतर खाली सेप्टिक टँकदेखील आढळून आला आहे. या टँकमध्ये जनावरांची हाडं आणि काही भाड्यांचं अवशेषदेखील मिळाले आहे. त्यावरून 27 हजार वर्षांपूर्वी कुठले प्राणी अस्तित्वात होते, त्यावेळची खाद्यसंस्कृती कशी होती वगैरे बाबींचा शोध घेतला जाणार आहे.