मोहोळ : पाटकुल (ता . मोहोळ ) येथे घर जागेच्या हद्दी खुणा असलेले दगड का काढले म्हणून विचारले असता वकिलास गंभीर मारहाण केल्याची घटना घडली असून मोहोळ पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.
मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील रामचंद्र उत्तम वसेकर हे वकिली व्यवसाय करतात. या व्यवसायानिमित्त सध्या पुणे येथे राहत आहेत. त्यांचा चुलत भाचा प्रशांत बिरू जाधव यांनी त्यांच्या घरामागील तीन फूट जागा असताना हद्दीत खुणा असलेले दगड काडून टाकले होते. ते दगड का काडून टाकले म्हणून विचारले असता त्याने ॲड. रामचंद्र वसेकर यांना चप्पल फेकून मारली. त्यानंतर हातात दगड घेऊन तो नाकावर मारला.
त्यामुळे त्यांच्या नावास दुखापत झाली त्यांचा चुलत भाऊ सुनील वसेकर आणि चुलती नंदा वसेकर या दोघांनी त्यांचे दोन्ही हात धरून पकडले व प्रशांत जाधव त्याने पोटात बुक्क्या मारल्या तसेच चप्पलनेही मारहाण केली. एवढे मारूनही त्यांनाच उलट केस करण्याची धमकी दिली. ही घटना आज रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत प्रशांत जाधव, सुनिल वसेकर, नंदा वसेकर या तिघांविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* विवाहितेचा छळ ; पतीसह चौघांवर गुन्हा
सोलापूर : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी व तिला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याची घटना दि.३० जून २०२१ ते ६ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडली. याप्रकरणी आश्विनी शुभम जाधव (वय-२४,रा. कैकाडी गल्ली,उत्तर कसबा, बाळीवेस सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती शुभम आनंद जाधव (वय-२४),संगीता आनंद जाधव (वय-४०), आनंद दत्तू जाधव (वय-५०),अंजली आनंद जाधव (वय-२३ सर्व रा.साई अंबर रेसिडेन्सी पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादीचे लग्न झाल्यापासून ते आजतागायत पर्यंत वरील संशयित आरोपींनी मिळून फिर्यादी आश्विनी यांची कोणतीही चूक नसताना विनाकारण स्वयंपाकावरून व धुणी भांडीवरून लायकी काढत होते.त्यानंतर फिर्यादीला तू वेडी आहेस, असे म्हणून मानसिक व शारीरिक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक कामूर्ती हे करीत आहेत.
* गोठ्यात बांधलेली म्हैस पळवली
सोलापूर : कोणीतरी अज्ञात चोरट्याने शेतातील गोठ्यात बांधलेली तीस हजार रुपये किमतीची म्हैस चोरून नेल्याची घटना ८ ते ९ ऑक्टोंबर दरम्यान शिवाजी नगर बाळे येथे घडली. याप्रकरणी शैलेश आप्पासाहेब तोडकरी (वय-२९, रा. बार्शी रोड,बाळे,सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी यांनी आपल्या शेतातील गोठ्यामध्ये म्हैस बांधून ठेवली होती.त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने संधीचा फायदा घेत गोठ्यात बांधलेली म्हैस चोरून नेली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून,पुढील तपास पोलिस नाईक डोके हे करीत आहेत.
* लोन करून देतो म्हणून फसवणूक ; दोन जणांवर गुन्हा
सोलापूर : हाउसिंग फायनान्सकडून लोन करून देतो म्हणून किराणा दुकानदाराची फसवणूक केल्याची घटना २० नोव्हेंबर २०२० ते आजतागायत पर्यत घडली. याप्रकरणी रुचिता प्रमोदकुमार जैस्वाल (वय-२८,रा. राघवेंद्र नगर,जुना विडी घरकुल,सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गोविंद तुम्मा (रा.जुना विडी घरकुल) व संतोष कोरे (रा.विष्णू मिल चाळ, सोलापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,वरील संशयित आरोपींनी संगणमत करून फिर्यादीच्या नावे प्लॉट करिता श्रीराम हाऊसिंग फायनान्स कडून लोन करून देतो असे सांगितले.त्यानंतर फिर्यादीकडून शंभर रुपयाच्या कोऱ्या स्टॅम्पवर सही घेऊन तो प्लॉट सुरेखा चीप्पा यांना भाड्याने दिल्या बाबतचे बनावट भाडे करारपत्र करून त्यांच्याकडून दोन टप्प्यांत एकूण ४० लाख रुपये स्वीकारले.
त्यानंतर फिर्यादीच्या मालकीच्या प्लॉटमध्ये फिर्यादीच्या परवानगीशिवाय भाडेकरू ठेवून ती रक्कम फिर्यादी रुचिता जैस्वाल यांना न देता आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रकमेचा वापर करून फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहेत.