टेंभुर्णी – पाणी साठवण क्षमतेच्या १२३ टीएमसी असलेले महाराष्ट्रातील मोठे असलेल्या धरणापैकी सोलापूर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं उजनी धरण काल शनिवारी (ता.९) पूर्ण क्षमतेने १०९.६८ टक्के भरून र्ओव्होर फ्लो झाले. त्यामुळे आज उजनी धरणाचे ४१ पैकी १६ दरवाजे ०.३५ सेंटीमीटरने उचलून २० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला आहे.
नदीकाठच्या गावांना प्रशासनाचे वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आहे. उजनीने शंभर टक्केचा पल्ला पार केल्यामुळे सोलापूर जिल्हा लाभक्षेत्रात असलेल्या शेतकरी, व्यापारी व साखर कारखानदार आनंदीत झाले आहेत. सोलापूर, पणे, अहमदनगर या जिल्ह्यातील शेतक-यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण पुणे जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे दरवर्षी ऑगस्टमध्ये भरणारे तर चालू वर्षी मात्र सप्टेंबरच्या अखेरीस शंभर टक्के भरले, परंतु पुणे जिल्हा व भीमा खोऱ्यात पावसाने पाठ फिरवल्याने चालूवर्षी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १११.२७ टक्के भरेल का नाही याची गॅरंटी कमी वाटत होते. परंतु काल शनिवारी पुणे जिल्ह्यासह भीमा खोऱ्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरण शंभर टक्के भरले.
डिंभे १०१८,घोड ५१००, कळमोडी ६४,कासारसाई १५०, आद्रा ६५ या धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मिसळू लागला आहे. यामुळे शनिवारी रात्री ९ वाजता ५ हजार क्युसेक विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला होता. त्यामध्ये वाढ करून आज रविवारी सकाळी ८ वाजता १० हजार क्युसेक्सने वाढ करून सोळा दरवाजे पस्तीस सेंटीमीटर ने उचलून २० हजार क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात चालू केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे यावर अलंबून असलेल्या शेतीचा तसेच औद्योगिक वसाहतीचा तसेच पाण्याचा सोलापूर,उस्मानाबाद,शहरासह अनेक गावच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. उजनी पूर्ण क्षमतेने भरले तर या भागातील उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. यामुळे साखर कारखाने पूर्ण क्षमतेने,पूर्ण वेळ चालतात. यामुळे परिसरातील उद्योग व्यवसायात वाढ होत असल्यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक व कारानदार आनंदित झाला आहे.
मागील वर्षी उजनीच्या पाणलोट क्षेत्रात एकाच दिवसात जवळपास दीडशे मिलीमिटर पाऊस पडला होता.यामुळे ऐनवेळी भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडावा लागला होता. १६ अॉक्टोंबर रोजी पंढरपूरमध्ये २ लाख ९१ हजारांचा विसर्ग होता. अचानक पूरस्थिती उद्भवलेल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. तसेच नदी काठावरील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसाचा अंदाज घेऊन उजनीतून योग्य प्रमाणात पाणी सोडण्याची गरज आहे.
भीमा खो-यातील बहुतांशी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्व धरणे १००टक्के भरली आहेत तर डिंभे १०१८,घोड ५१००, कळमोडी ६४,कासारसाई १५०, आद्रा ६५ या धरणातून पाणी सोडल्याने दौंड येथील भीमापाञात हजाराच्या कमी जास्त फरकाने विसर्ग होत आहे. शनिवारी पावसाची दमदार सुरुवात झाल्याने सात धरणातून उजनी पात्रात पाणी १२ हजार २०९ क्युसेसने मिसळुन आज झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. रात्रीत पुन्हा विसर्ग वाढून पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. सोलापूर जिह्यातील उजनी लाभक्षेञातील शेतकरी सुखावला झाला आहे.
* आजची दुपारी १२ पर्यंतची स्थिती
– एकूण पाणीपातळी ४९७.२६० मी.
– ए.पाणीसाठा… ३४६६.८४ दलघमी
– टक्केवारी ..१०९.६८ टक्के
– एकूण साठा ..१२२.४२ टीएमसी
– उपयुक्त साठा..५८.७६ टीएमसी
– उजनीत येणारा विसर्ग
दौंड..१२२०९ क्युसेक
– नदीतून सोडण्यात आलेला विसर्ग
कालवा १५०
बोगदा १५०
दहिगा् उपसा ६३
भीमा नदी. २००००