नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीतील फिरोज शहा कोटला स्टेडियममधील एका सामन्यात बॉल लागल्याने अंपायरचा मृत्यू झाला आहे. सुमीत बन्सल असं त्यांचं नाव असून ते ४६ वर्षांचे होते. २ ऑक्टोबर रोजी बन्सल यांच्या चेहऱ्याला बॉल लागला होता. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांचे हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झालं. ज्येष्ठ पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ही माहिती ट्विट करुन दिली आहे.
बीसीसीआयचे मान्यताप्राप्त अंपायर असलेले सुमीत हे माजी आंतरराष्ट्रीय अंपायर एस.के. बन्सल यांचे पुत्र होते. २ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियममध्ये झालेल्या मॅचमध्ये त्यांच्या चेहऱ्याला जोरात बॉल लागला होता. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांचे हृदयक्रिया बंद पडल्यानं निधन झालं. ज्येष्ठ पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ही माहिती ट्विट करुन दिली आहे.
सुमीत बन्सल यांच्या निधनानंतर क्रिकेट मैदानातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भारताचा क्रिकेटपटू रमण लांबा याचा बांगालादेशमध्ये क्रिकेट खेळताना बॉल लागल्यानं १९९८ साली मृत्यू झाला होता. तसंच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू फिलिप ह्यूजेस या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचही काही वर्षांपूर्वी बॉल लागल्यानं निधन झालं होतं.
* T20 World Cup: विजेत्या संघाला मिळणार एवढी रक्कम
टी २० वर्ल्डकपला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आयसीसीने विजेत्या आणि उप विजेत्या संघाला किती रुपयांचं बक्षीस मिळणार याची घोषणा केली. विजेत्या संघाला १.६ दशलक्ष डॉलर्स (जवळपास १२ कोटी), तर उपविजेत्या संघाला ८ ,००,००० डॉलर्स म्हणजेच ६ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धेतील १६ स्पर्धक संघांना ५.६ दशलक्ष डॉलर्सचा बक्षीस म्हणून वाटा मिळेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विजेत्या संघाला १.६ दशलक्ष डॉलर्स (जवळपास १२ कोटी), तर उपविजेत्या संघाला ८,००,००० डॉलर्स म्हणजेच ६ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धेतील १६ स्पर्धक संघांना ५.६ दशलक्ष डॉलर्सचा बक्षीस म्हणून वाटा मिळेल. १० आणि ११ नोव्हेंबरला होणाऱ्या उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ४,००,००० डॉलर्स म्हणजेत ३ कोटी रुपये मिळणार आहेत.
सुपर १२ मधील विजेत्या संघांना बोनस मिळणार आहे. सुपर १२ च्या प्रत्येक ३० सामन्यातील विजेत्या संघाला ४० हजार डॉलर्स म्हणजेच ३० लाख रुपये दिले जातील. तर या टप्प्यात नॉकआउट होणाऱ्या संघांना ७० हजार डॉलर्स म्हणजेच ५२.५९ लाख रुपये मिळतील. पात्रता साखळी फेरीतील प्रत्येक विजयाला ३० लाख रुपये मिळणार आहेत. राउंड १ मध्ये बांगलादेश, नामीबिया, नेदरलँड, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलँड आणि श्रीलंका देश आहेत. तर आफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, भारत आणि वेस्टइंडिज हे संघ सुपर १२ मध्ये आहेत.