मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी ज्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी ड्रग्ज कुठे लपवले होते, याची माहिती समोर आली आहे. आरोपी मुनमुन धामेचाने ड्रग्ज लपवण्यासाठी सॅनिटरी पॅड्सचा वापर केला, असा एनसीबीचा दावा आहे. मुनमुन धामेचा क्रुझवर ज्या खोलीत होती, तिथल्या झडतीचा एक व्हिडिओ एनसीबीने जारी केला आहे. तिथे सॅनिटरी पॅड्समध्ये ड्रग्ज लपवल्याचं आढळून आलं आहे, असा दावा एनसीबीकडून करण्यात आला आहे.
मुनमुन धामेचा क्रुझवर ज्या खोलीत होती, तिथल्या झडतीचा एक व्हिडीओ एनसीबीने जारी केला आहे. तिथे सॅनिटरी पॅड्समध्ये ड्रग्ज लपवल्याचं आढळून आलं आहे, असा दावा एनसीबीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात ज्या तरुणींना अटक करण्यात आली आहे, त्यांनीही ड्रग्ज लपवण्यासाठी सॅनिटरी पॅड्सचा वापर केला होता, तर तरुणांनी शूजमध्ये ड्रग्ज लपवले होते, असाही एनसीबीचा दावा आहे.
#AryanKhanDrugCase Drugs being recovered from sanitary pad from ship room of accused munmun
(Exclusive footage) #DrugsParty pic.twitter.com/V2gcZktVLT— Gyanendra Shukla (@gyanu999) October 9, 2021
ट्वीटर हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. क्रूझवरील मुनमुन धमेचाच्या रूममधून ड्रग्ज सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका अधिकाऱ्याने सॅनिटरी पॅड रुममधील कार्पेटवर ठेवून त्यातून ड्रगची गोळी बाहेर काढताना दिसत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुनमुन एक मॉडल आहे. ती ३९ वर्षांची आहे. ‘एनसीबी’ने ३ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता तिला अटक केली होती. ही मूळची मध्य प्रदेशमधील आहेत. सागर जिल्ह्यातील तिचे वडील उद्योजक होते. त्यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मुनमुन धामेचा हिच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले. तिचा भाऊ प्रिन्स धमेचा हा दिल्लीत वास्तव्याला आहे.
मुनमुनने आपले शालेय शिक्षण सागर जिल्ह्यात पूर्ण केले. सागर जिल्ह्यात फार कमी लोकांना तिच्याबद्दल माहिती आहे. कारण मागील काही वर्ष ती आपल्या भावासोबत दिल्लीत आणि त्याआधी भोपाळमध्ये राहिली आहे. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते.
तिचे १० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, विकी कौशल आणि अन्य अभिनेत्यांना फॉलो करते. मुनमुनच्या वकिलांनी तिच्याकडे ड्रग्स नसल्याचे सांगितले होते. अधिकाऱ्यांच्या तपासादरम्यान मुनमुन त्या खोलीत जाण्याआधी काही जण तिथे होते. यावेळी एनसीबीचे अधिकारी आले, त्यांनी त्या खोलीतील कार्पेटवर पडलेले ड्रग मुनमुनचे असल्याचे सांगत तिला अटक केल्याचा आरोप केला.
मुंबई ड्रग्ज केस प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज किल्ला कोर्टाने पुन्हा एकदा फेटाळून लावला. दोन दिवसांपूर्वी आर्यन खानच्या जामीन अर्जावर कोर्टात प्रचंड युक्तिवाद रंगला. पण अखेर कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. पण किला कोर्टात जामीन अर्ज दाखल करता येऊ शकत नाही, या मुद्द्यावर बोट ठेवून कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.