बार्शी : पहाटेच्या सुमारास डुलकी लागल्याने अनियंत्रित होवून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी झालेल्या ट्रक खाली सापडून चालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना बार्शी – सोलापूर रस्त्यावर वैरागच्या पुढे असलेल्या उस्मानाबाद चौकात झाली.
पीरसाहब कोंडीलाल नदाफ (रा.बोरामणी. ता. दक्षिण सोलापूर) या अपघातात मृत्यू पावले. तर त्यांचा सहकारी ऋतुराज उत्रेश्वर भालेराव (रा. तळे हिप्परगा. ता.उत्तर सोलापूर) हा सावध असल्यामुळे वाचला. या अपघाताची वैराग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पीरसाहब नदाफ हे आपल्या एम एच बारा एफ सी 8413 या बारा टायरच्या ट्रक मध्ये सुमारे 25 टन लोखंड घेवून जालन्याहून सोलापूरकडे निघाले होते. आज रविवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी वैराग ओलांडले. त्यानंतर काही अंतरावरच त्यांना झोप अनावर झाली. अचानक समोरुन आलेल्या टेंपोच्या प्रकाशात त्यांना रस्ता न दिसल्याने उजव्या बाजूला रस्त्याच्या खाली जावून ट्रक पलटला.
यावेळी नदाफ यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा पाय केबिनमध्ये अडकल्यामुळे ट्रकच्या वजनाचा भार त्यांच्या अंगावरच आला. त्यामुळे जबर जखमी होवून ते जागीच मयत झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, आई, पत्नी आणि भाऊ असून कुंटूबांचा मुख्य आधार गेला आहे.
ट्रकचे पंधरा हजारांचे नुकसान झाले आहे. या बाबत क्लिनर ऋतुराज भालेराव याच्या फिर्यादीवरुन हयगयीने व निष्काळजीपणे वाहन चालवून स्वत:च्या मृत्यूला व ट्रकच्या नुकसानीला कारणीभूत झाल्या प्रकरणी नदाफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस अंमलदार सदाशिव गवळी करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अकलूज येथील मेडीकलमधून साडेपाच लाख गायब, दुकानातील १२ कामगारांविरोधात गुन्हा दाखल
अकलूज : संग्रामनगर अकलूज येथील अभय मेडिकल स्टोअर्समधून साडेपाच लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याप्रकरणी पोलिसांनी दुकानातील संशयीत १२ कामगारांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात दुकानाचे चालक डाँ मनोहर कालिदास इनामदार (वय ६९ रा.संग्रामनगर) यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दाखल केली. ते त्याप्रमाणे पोलिसांनी सुशांत माने (रा. उघडेवाडी) रोहन कदम, कुलकर्णी, महादेव भंडारे, त निलेश गिरमे, सविता मुधळे, मधुकर मैंदाळ, प्रज्योत पंचवाघ (सर्व रा. संग्रामनगर ) दयानंद रेणके, सोन्या गोरे, सायली कुलकर्णी ( सर्व रा. अकलूज) प्रविण जगताप (रा. माळीनगर) आणि सायली कुलकर्णी अशा संशयित बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
औषध दुकानाच्या खोलीमध्ये ठेवलेली ५ लाख ५० हजार ९०० रुपयाची रोकड असलेली पिशवी २९ सप्टेंबरच्या रात्री ते दुसर्या दिवशीच्या सकाळी चोरीस गेली. ती रक्कम दुकानात काम करणाऱ्यांनी चोरून नेली असावी, अशा आशयाची फिर्याद मनोहर इनामदार यांनी पोलिसात दिली. सहाय्यक निरीक्षक मारकड हे पुढील तपास करीत आहे .