सोलापूर : सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांची शुक्रवारी नियुक्ती झाली होती. तसा राज्याच्या गृह विभागाने आदेश काढला होता. आज सोमवारी सायंकाळी हरिश बैजल यांनी पदभार घेतला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून फदोन्नतीवर जात असलेले अंकुश शिंदे यांच्या हस्ते नूतन पोलीस आयुक्त हरिश बैजल यांनी पदभार स्वीकारला.
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे तसेच पोलिस उप महानिरीक्षक हरिष बैजल या दोघा बड्या पोलिस अधिका-यांचा शुक्रवारी झालेल्या बदल्यात समावेश होता.
सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा मुंबई या ठिकाणी पदोन्नती मिळाली, सोलापूर शहरचे अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची ऑगस्ट महिन्यात पोलिस आयुक्त (सोलापूर शहर) म्हणून करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच कराळे यांनी सोलापुरात येण्यास टाळाटाळ करीत नापसंती दर्शवल्याने हरिश बैजल यांची नियुक्ती झाली आहे. मात्र यामुळे अंकुश शिंदे यांना काही दिवस सोलापुरात थांबावे लागले.
पोलिस उप महानिरीक्षक हरीश बैजल यांची सायबर व म.अ.प्र., महाराष्ट्र राज्य, मुंबई येथून सोलापूर शहर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहर येथे असलेली आदेशाधीन बदली रद्द करण्यात आली असून त्यांची नियुक्ती पुणे पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत झाली आहे.
दरम्यानच्या काळात राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर हा विषय काढला असता त्यांनी येणाऱ्या पंधरा दिवसात नव्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती होईल, अशी माहिती दिली होती. त्यानुसार शुक्रवार, 8 ऑक्टोबर रोजी सोलापूरसाठी नवे पोलिस आयुक्त म्हणून हरीश बैजल यांची नियुक्ती झाली आहे.
This is a very nice post. Thank you for writing this.