मुंबई : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालयं सुरू होणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत, जिल्ह्यातील कोरोना स्थितीनुसार नियम असतील, असंही त्यांनी सांगितलं. तसेच स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घ्यावा, असंही सामंत म्हणाले.
राज्यातील आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले, मात्र कॉलेज कधी सुरू होणार याबाबतची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. राज्यातील सर्व महाविद्यालये येत्या २० ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी महत्त्वाची सूचना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेद्वारे केली.
कॉलेज सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली करण्यात आलीय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री आणि सचिव यांची एक बैठक झाली, या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आलाय. विद्यापीठ महाविद्यालय वर्ग ५० टक्के पेक्षा अधिक सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणाला देण्यात आलेत, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलीय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कॉलेज सुरू करायचे वा नाही याबाबतचा निर्णय विद्यापीठांवर सोडण्यात आला आहे. कॉलेज सुरू करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाशी विचार विनिमय करून विद्यापीठांनी निर्णय घ्यायचा आहे, असेही सामंत यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात बोलवावे, अशा राज्य सरकारच्या स्पष्ट सूचना आहेत.
५० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीनिशी कॉलेज सुरू करायचे असल्यास स्थानिक परिस्थितीचा विचार करून त्यानुसार निर्णय घ्यावा, असे सांगताना ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात बोलवावे, अशा सूचना दिल्या असल्याचे सामंत यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही, अशा विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी महाविद्यालये आणि स्थानिक प्राधिकरणाने पुढाकार घेऊन कार्यक्रम आखावा, असेही निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
“तिसरी लाट येणार आहे की नाही ते अद्याप कुणालाच माहिती नाही. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची नियमावली तयार करण्याची वेळ आली तर विद्यापीठाने त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे स्पष्ट मत आम्ही शासन म्हणून घेतलेला आहे. कारण काही अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. तसेच काही ठिकाणी प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे हीच नियमावली लागू करायची की नाही याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. प्रत्येक जिल्ह्यात कदाचित वेगवेगळी नियमावली असू शकते”, असं सामंत म्हणाले.
* अशी आहे नियमावली….
– आपले दप्तर भरताना शालेय वस्तूंसोबतच सॅनिटायझरची बाटली जरुर भरा.
– शाळेत जाण्यासाठी तयार होताना तोंडावर मास्क घालणे विसरू नका.
– शाळा घराजवळ असेल तर चालत किंवा सायकलने जा. बसने जाताना एका सीटवर ४. एकाच विद्यार्थ्याने बसावे, पूर्ण वेळ मास्क वापरा.शाळेत प्रवेश करताना आणि शाळा सुटताना शारीरिक अंतर पाळा.
– शाळेत येताना शाळेतील कर्मचा-यांना विद्यार्थ्यांचे तापमान मोजू द्या.
– वर्गात प्रवेश करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझरने निर्जंतुक करा.
– नेमलेल्या बाकांवरतीच बसा, मित्रांसोबत जागेची अदलाबदल करू नका.