मोहोळ : सध्या पावसाळा असल्यामुळे आपणास शेतीच्या पाण्याबाबत काळजी वाटत नाही, परंतु इंदापूर आणि बारामतीकरांनी केलेल्या पाणी पळवापळवीमुळे उन्हाळ्यामध्ये पाणी मिळते की नाही याबाबत शंका वाटते. ते मिळवण्यासाठी आता पासूनच लढा उभा करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नूतन जिल्हा अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहीते-पाटील यांनी केले
मोहोळ तालुक्यात दोन दिवसांचा जनसंपर्क दौरा डॉ. धवलसिंह मोहीते पाटील यांनी पूर्ण करून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा शाहीन शेख यानी मोहोळ शहरातील हॉटेल शुभम येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. तेथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष राजेश पवार, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात, मोहोळ तालुका अध्यक्ष अशोक देशमुख, सुरेश शिवपुजे, सुभाष पाटील देवानंद गुंड पाटील, राजेश पवार,किशोर पवार, बिरा खरात, दाजी कोकाटे, अमजद शेख, रशीद पठाण, तालुक सरचिटणीस संतोष शिंदे आदी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती शाहीन शेख यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की डॉ. धवलसिंह मोहीते पाटील जिल्हा अध्यक्ष झाल्यामुळे कार्यकत्यांना उर्जा मिळाली आहे. कार्यकर्ता तयार करण्याचा कारखाना म्हणून मोहिते पाटील यांच्याकडे पाहिले जाते. जिल्ह्यात सध्या काँग्रेसचा एक आमदार आहे, मात्र धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह जास्तीत जास्त आमदार येतील, असा आशावाद असल्याचेही यावेळी महिला जिल्हाध्यक्षा शाहीन शेख यांनी सांगितले.
डॉ. धवलासिह मोहिते पाटील म्हणाले, की पक्ष मोठा बनवायचा असेल तर कार्यकर्ता मजबूत झाला पाहिजे, यासाठी आवर्जून काँग्रेस कार्यकर्ता जनसंपर्क दौरा आयोजित केला असून येणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. नवीन युवा कार्यकर्त्यांना यानिमित्ताने संधी देण्याचा मानस असून जिल्ह्यातील युवाशक्तीनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय क्षेत्राची सुरुवात करावी, असे सांगत काँग्रेस पक्षात सर्व जाती धर्मातील नागरीकाना सामावून घेण्याची ताकद आहे. भाजपा सरकार महागाईचे रान उठवून सतेवर आले आहे. त्यावेळी ४०० रुपये गॅस सिलेंडर व ६० रु लिटरमध्ये मिळणार पेट्रोल जास्त वाटत होते आता गॅस सिलेडर एक हजार रुपये तर पेट्रोल १०० रु.च्या पुढ गेले आहे सर्व सामान्याचे बजेट कोलमडले आहे.
शेतीचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे याचा फायदा निश्चितपणे काँग्रेस पक्षाला मिळेल, असे ही ते पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे देताना म्हणाले. अतीवृष्टी बाबत बोलताना पंचनामे तातडीने करण्याची मागणी करून भरीव मदत मिळणे अपेक्षित आहे. परंतु केवळ ४ हजार रुपयाचे जाहीर केलेले आहे. वाढवून मदत मिळण्यासाठी आमचा प्रयत्न चालू असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश साळुंके यांनी तर आभार संतोष शिंदे यांनी मानले.