मुंबई : मुंबईच्या लालबाग परिसरात वन अविघ्न पार्क इमारतीला आज भयंकर आग लागली. यावेळी आगीपासून स्वतःला वाचवण्यासाठी 19 व्या मजल्यावरून एका व्यक्तीने खाली येण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पडला आणि त्याचा मृत्यू झाला. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लेव्हल 4 ची ही आग आहे. भारतमाता थिएटरसमोर अविघ्न पार्क ही इमारत आहे. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत 60 मजल्यांची आहे.
आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाली होती, तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. उंचावर वाहत असलेल्या वाऱ्यामुळे आग भडकत असून, जीव वाचवण्यासाठी इमारतीलमधील रहिवासी आटापिटा करत असल्याचे वृत्त आहे.
अविघ्न वन पार्कमधील 19 व्या मजल्यावर भीषण आग लागली. ही आग हळूहळू वाढत गेली. तिनं आणखी काही मजले कवेत घेतले. एक व्यक्ती जीव वाचवण्यासाठी बाल्कनीमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केली. या प्रयत्नात ती तीस वर्षीय व्यक्ती खाली कोसळली. अरुण तिवारी असं त्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
करी रोड येथील माधव पालव मार्गावर वन अविघ्न पार्क ही 60 मजली इमारत आहे. या इमारतीमधील 19 व्या मजल्याला ही आग लागली आहे. सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही आग लागली आहे. आगीची भीषणता पाहून लेव्हल तीनची आग असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र आगीचे गांभीर्य वाढल्याने ही आग लेव्हल चारची असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत.
आग विझविण्यासाठी अग्नीशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. ही हायफ्रोफाईल सोसायटी आहे. पण, त्यांची पाण्याची यंत्रणा सुरू नव्हती. याबाबत स्वतः सोसायटीचे सदस्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे सोसायटीच्या व्यवस्थापनावर कारवाई व्हायला पाहिजे, असं महापौर किशोर पेडणेकर म्हणाल्या.
आग विझविण्यासाठी अग्नीशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. ही हायफ्रोफाईल सोसायटी आहे. पण, त्यांची पाण्याची यंत्रणा सुरू नव्हती. याबाबत स्वतः सोसायटीचे सदस्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे सोसायटीच्या व्यवस्थापनावर कारवाई व्हायला पाहिजे, असं महापौर यांनी सांगितलंय.
* हरयाणात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू
चंदीगड : हरयाणाच्या झज्जर येथे शुक्रवारी एका भरधाव ट्रकने केएमपी एक्सप्रेस वेवर उभ्या असलेल्या कारला धडक दिली. यामध्ये एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व उत्तर प्रदेशातील होते. या अपघातात एक मुलगी जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.