बार्शी : जॉन डियर कंपनीचे वितरक मधुबन ट्रॅक्टर्सने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या चार राज्यात ट्रॅक्टर विक्रीचा उच्चांक करुन कंपनीच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलला आहे, असे कौतुकोद्गार कंपनीचे ऑल इंडिया मार्केटिंग हेड प्रभात सक्सेना यांनी काढले.
ते मधुबनच्या तुळजापूर येथील नवीन ट्रॅक्टर शोरूमच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कंपनीचे एरिया मॅनेजर अंकित सक्सेना, जॉन डियर कंपनीचे बार्शी तालुका व उस्मानाबाद जिल्ह्याचे वितरक प्रवीण कसपटे, सैराट फेम सिनेअभिनेता सुरेश विश्वकर्मा, बार्शी रोटरी क्लब चे अध्यक्ष विक्रम सावळे, असिस्टंट एरिया मॅनेजर कैलास तासकर, विभागीय कस्टमर सपोर्ट मॅनेजर अनिल पाटीदार, विभागीय डीलर डेव्हलपमेंट मॅनेजर आदींसह कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते,शुभारंभादिनीच परिसरातील 21 शेतकर्यांना ट्रॅक्टरचे प्रातिनिधीकरित्या चावी देवून वितरण करण्यात आले.
सक्सेना पुढे म्हणाले, 2009 पासून सलग 14 वर्ष शेतकर्यांना सर्वोत्तम सेवा देणार्या मधुबन ट्रॅक्टर्सने बार्शी तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विक्रीचे अजोड जाळे निर्माण करुन शेतकरी ग्राहकाचा विश्वास संपादन केला आहे. जॉन डीयर कंपनी व ग्राहकांचा गेल्या 185 वर्षापासूनचा पिढ्यानपिढ्या संबंध आहे. राज्यातील पुणे व मध्य प्रदेश मधील देवास येथील कारखान्यातून संपूर्ण जगभरात ट्रॅक्टर ची विक्री करण्यात येत आहे.शेतकर्यांना पाच वर्षांची वॉरंटी फक्त जॉन डियर ही कंपनी देत आहे. प्रत्येक वर्षी कंपनीचा नव-नवीन व चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न भविष्यातही असाच राहणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी युवा उद्योजक प्रवीण कसपटे यांनी, मधुबन ट्रॅक्टर्सच्या विक्री आणि विक्रीपश्चात सेवेच्या दर्जामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. आतापर्यंत 9 विक्री केंद्रातून सुमारे तीन हजार शेतकर्यांना ट्रॅक्टर विक्री केली आहे. येत्या महिन्यात नळदुर्ग व वैराग येथे शाखा उघडण्याचे नियोजन असून यामार्फत जास्तीत जास्त शेतकर्यांना चांगल्या सुविधा निर्माण करून देणार आहे, अशी ग्वाही दिली.
अंकित सक्सेना म्हणाले की, महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानीच्या पवित्र भूमीत जॉन डियर कंपनीचे विक्री केंद्र सुरू होत असल्याबद्दल आनंद होत आहे. कंपनीचा ट्रॅक्टर विक्रीत महाराष्ट्रात दुसरा व देशात तिसरा क्रमांक आहे. शेतकर्यांच्या हिताचा विचार करून कंपनीने ट्रॅक्टरमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर एक नंबर वर असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक वजन वाहतूक करण्याची क्षमता या ट्रॅक्टरमध्ये असल्याने शेतकर्यांचा आमच्या कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी करण्याकडे कल आहे. नव-नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकरी कंपनीच्या ट्रॅक्टर खरेदीला पसंती देत आहेत. ट्रॅक्टरला कमी डिझेल लागते, त्यामुळे शेतकर्यांना फायदा होत आहे.
सैराट फेम सिनेअभिनेता सुरेश विश्वकर्मा म्हणाले की, मधुबनने शेतकर्यांमध्ये विश्वास कमावला आहे. एसी ट्रॅक्टरची संकल्पना शेतकर्यांसाठी चांगली असून भविष्यात ट्रॅक्टरला ग्राहकांची जास्त मागणी असेल. डॉ. नवनाथ कसपटे यांचे सिताफळ संशोधनातील कार्य फार मोलाचे आहे. त्यांनी सुमारे चार दशके सीताफळावर संशोधन करुन दोन हजार वेगवेगळ्या प्रकारचे फळ काढीत शेतकर्यांना नवीन व्यवसायासाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे चिरंजीव प्रवीण कसपटे यांनी ही वडिलांच्या खांद्याला-खांदा लावत ट्रॅक्टर विक्री व्यवसायात चांगली प्रगती केली आहे, याचे समाधान वाटत असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन नरेशसिंह ठाकुर व आभार मधुबन ट्रॅक्टरचे व्यवस्थापक माणिक हजारे यांनी मानले.