मुंबई : ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांवर आरोप केले होते. याप्रकरणी मलिकांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला मुंबई हायकोर्टात दाखल केला आहे. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर बिनबुडाचे, खोटे आरोप केले. यामुळे आपण हे पाऊल उचलले असल्याचे कंबोज म्हणाले.
मोहित कंबोज यांनी स्वतः ट्विटरवरुन ही माहिती दिली. मोहित कंबोज यांनी ट्विट केले की, ‘माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर बिनबुडाचे आरोप केले. यामुळे आमची प्रतिमा खराब झाली. त्याबद्दल मी नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा नुकसानीचा दावा दाखल केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक हे भाजप नेते मोहित कंबोज आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सातत्याने गंभीर आरोप करत होते. मुंबई ड्रग्ज प्रकरणातही त्यांच्या कुटुंबाचे कनेक्शन सातत्याने ठेवले जात होते. यामुळे 9 ऑक्टोबर रोजी मोहितने मलिक यांना नोटीस पाठवली होती. पुराव्याशिवाय बदनामीकारक वक्तव्य करणे चुकीचे आहे, असे त्या नोटिशीत नमूद करण्यात आले होते. परंतु नवाब मलिक यांनी त्या सूचनेला न जुमानता आपला हल्ला सुरूच ठेवला आणि 11 ऑक्टोबर रोजी पुन्हा त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य केले.
2nd Case : Today I Have Filled Damages Suit Against मियाँ Nawab Mallik For 100 Crores in High Court Mumbai For Putting Baseless Allegations Against Me and My Family ! pic.twitter.com/6Ck7XuWXpP
— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) October 30, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आता भाजप नेत्याने मलिक यांच्यावर कायदेशीर कारवाईची तयारी केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली असून नवाब मलिक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा खटलाही दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मोहितने स्वत: भाजपचे सदस्य असून त्यांचा व्यवसायही असल्याचे सांगितले आहे. मात्र, नवाब मलिक यांच्या निराधार आरोपांनी त्यांची प्रतिमा डागाळण्याचे काम केल्याचे ते म्हणाले.
एका वृत्तानुसार, भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना 9 ऑक्टोबरला नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना त्यांच्या विरोधात वक्तव्य करण्यापासून परावृत्त करण्याचा इशारा दिला होता. असे असतानाही नवाब मलिक यांनी 11 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन मोहित कंबोज यांच्यावर अनेक आरोप केले.
महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई ड्रग्ज प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत. आता मोहित कंबोज यांनी मलिकांवर 100 कोटी रुपयांचा दावा ठोकल्यामुळे या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. या दाव्याला मलिक काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
Terrific story! Prefer appreciated a checking. I’m hoping for reading a great deal more from your business. I’m sure that you’ve good perception and additionally sight. My corporation is tremendously influenced due to this critical information.
I see something truly interesting about your web blog so I saved to favorites.
I have been checking out some of your articles and i can state pretty good stuff. I will surely bookmark your website.
Hiya, I’m really glad I’ve found this information. Today bloggers publish just about gossips and web and this is really frustrating. A good site with exciting content, that’s what I need. Thank you for keeping this site, I will be visiting it. Do you do newsletters? Cant find it.
I am not positive the place you’re getting your information, however great topic. I must spend some time learning more or understanding more. Thanks for fantastic info I was looking for this information for my mission.
This really answered my problem, thank you!
Hello just wanted to give you a quick heads up. The words in your content seem to be running off the screen in Firefox. I’m not sure if this is a format issue or something to do with browser compatibility but I thought I’d post to let you know. The style and design look great though! Hope you get the problem resolved soon. Kudos