सोलापूर : राज्य किशोर व किशोरी निवड चाचणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ५ किशोर व ५ किशोरी खेळाडूंची निवड सोलापूर ॲम्युचर खो – खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण यांनी जाहीर केले. या खेळाडूंना असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
हे संघ १४ नोव्हेंबर रोजी युनायटेड स्पोर्ट्स क्लब ठाणे (पूर्व) येथे होणाऱ्या राज्य निवड चाचणीत भाग घेतील. उत्कर्ष क्रीडा मंडळाने ही चाचणी ह.दे प्रशालेच्या मैदानावर आयोजिली होती. यातून निवड समिती सदस्य अजित शिंदे (साेलापूर), संताेष पाटील (वाडीकुराेली) व जावेद मुलाणी (वेळापूर) यांनी हे खेळाडू निवडले.
किशोर : शंभू चंदनशिवे, झिशान मुलाणी, अरमान शेख ( वेळापूर), फराज शेख ( उत्कर्ष क्रीडा मंडळ), मोहन चव्हाण (किरण स्पोर्ट्स).
किशोरी : वैष्णवी काळे, ऋतुजा येलमार, स्नेहा लामकाने (वाडीकुरोली), प्राजक्ता बनसोडे ( वेळापूर), साक्षी व्हनमाने (किरण स्पोर्ट्स).
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* इंडियन बॉडी बिल्डिंग संघटनेच्या सचिवपदी सोलापूरचे प्रमोद काटे
सोलापूर : इंडियन बॉडी बिल्डिंग संघटनेच्या आयोजन समितीच्या सचिवपदी सोलापूरचे प्रमोद काटे यांची एकमताने निवड झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर सोलापूरला प्रथमच हा बहुमान मिळत आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. संजय जोशी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रमोद काटे यांनी १९८० मध्ये सोलापूर श्री हा किताब पटकावला होता.
सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग संघटनेच्या सचिव पदी कार्यरत आहेत. महाराष्ट्र संघटनेच्या सहसचिव पदावर कार्यरत आहेत तसेच राष्ट्रीय पातळीवर परीक्षक म्हणून काम करत आहेत. राष्ट्रीय पातळीवर सोलापूर जिल्ह्याचे पहिले निवड झालेले पदाधिकारी आहेत.