नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्याची धमकी, 112 कंट्रोल रूमच्या ट्विटर हँडलवर आली आहे. हा मेसेज आल्यानंतर क्राइम ब्रांचकडे तपास सोपविण्यात आला आहे. दीपक शर्मा नावाच्या अकाउंटवरून हा मेसेज आला. दरम्यान, क्राइम ब्रांचची अनेक पथकं याचा तपास करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ट्विटरवरील दीपक शर्मा नावाच्या अकाऊंटवरून ट्विट करण्यात आली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांत खळबळ उडाली. वरिष्ठांच्या सूचनेवरून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
गुरुवारी ट्विटरवर एका अज्ञात व्यक्तीने दीपक शर्मा नावाचे खाते तयार केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. एवढेच नाही तर या ट्विटर अकाउंटवरून अनेक आक्षेपार्ह ट्विटही करण्यात आले आहेत.
या सर्व ट्विटची दखल घेत यूपी 112 च्या अधिकाऱ्यांनी उच्च अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला.क्राइम ब्रँचचे अनेक पथक तपासात गुंतले असून काही सुगावाही लागल्याचे सांगण्यात येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यापूर्वीही सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या होत्या.त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासोबतच अनेक आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना ट्विटरवरून धमकावल्याप्रकरणी गुन्हे शाखेचे अनेक पथके तपास करत आहेत.आरोपींच्या अटकेबरोबरच या प्रकरणाचा लवकरच खुलासा करून कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान सन 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उद्या सोमवार, 8 नोव्हेंबर रोजी पंढरपूर दौऱ्यावर आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे अर्थात देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन पालखी मार्गांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंढरपूरला येणार आहेत तर त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीसीद्वारे उपस्थिती लावणार आहेत.
you are soooo talented on paper. God is truly utilizing you within tremendous ways. You are carrying out a excellent work! It was an excellent weblog!