सोलापूर : सोलापूर विभागावर पंढरपूर येथे कार्तिक यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून व इतर राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक, श्रध्दाळू पंढरपूर येथे कार्तिक यात्रेकरीता येतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाव्दारे आदिलाबाद- पंढरपूर-नांदेड स्पेशल एक्सप्रेस विशेष गाड्या चालविण्यात येत आहे. त्या गाड्या खालीलप्रमाणे आहेत. ज्या प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असले त्यांना गाडी प्रवेश मिळले. उद्यापासून या गाड्यांचे बुकींग सुरु होणार आहे.
• गाडी क्र. 07501 आदिलाबाद-पंढरपुर स्पेशल एक्सप्रेस दिनांक 14.11.2021 रोजी धावणार आहे. सदर गाडी आदिलाबाद स्थानकावरून रविवार 14.11.2021रोजी दुपारी 02.00 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक किनवट, बोधादी बुरुग, धनोरा डेक्कन, सहस्रकुण्ड, हिमायातनगर, हदगाँव रोड, भोकर, मुद्खेड, नांदेड एच. एस., पुर्णा, परभणी, गंगाखेर, परळी वैजनाथ, घाटनंदुर, लातुररोड, लातुर आगमन रात्री 02.30 प्रस्थान 02.45, उस्मानाबाद आगमन पहाटे 04.45 प्रस्थान 04.55, बार्शी टाऊन आगमन सकाळी.05:40 , प्रस्थान 05.45, कुर्डुवाडी आगमन सकाळी 06.30,प्रस्थान 06.35, पंढरपुर स्थानकावर सोमवारी सकाळी 08.00 वाजता पोहचेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
• गाडी क्र. 07502 पंढरपुर-नांदेड स्पेशल एक्सप्रेस दिनांक 15.11.2021 रोजी धावणार आहे. सदर गाडी पंढरपुर स्थानकावरून सोमवार सकाळी 11.10 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक कुर्डुवाडी आगमन दुपारी 12.05 प्रस्थान 12.10, बार्शी टाऊन आगमन दुपारी 12.45 प्रस्थान 12.47, उस्मानाबाद आगमन दुपारी 01.30 प्रस्थान 01.35, लातूर आगमन दुपारी 03.05 प्रस्थान 03.10, लातूररोड आगमन दुपारी 04.00 प्रस्थान 04.30, घाटनंदुर, परळी वैजनाथ, गंगाखेर, परभणी, पुर्णा, आणि नांदेड स्थानकावर रात्री 11.30 वाजता पोहचेल.
• गाडी क्र. 07503 नांदेड-पंढरपुर स्पेशल एक्सप्रेस दिनांक 18.11.2021 रोजी धावणार आहे. सदर गाडी नांदेड स्थानकावरून गुरुवारी सायंकाळी 06.20 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक पुर्णा, परभणी, गंगाखेर, परळी वैजनाथ, घाटनंदुर, लातुररोड, लातुर आगमन रात्री 02.30 प्रस्थान 02.45,उस्मानाबाद आगमन पहाटे 04.45 प्रस्थान 04.55, बार्शी टाऊन आगमन सकाळी.05:40,प्रस्थान 05.45, कुर्डुवाडी आगमन सकाळी 06.30,प्रस्थान 06.35, शुक्रवार,दिनांक 19.11.2021 रोजी पंढरपुर स्थानकावर सकाळी 08.00 वाजता पोहचेल.
• गाडी क्र. 07504 पंढरपुर- आदिलाबाद स्पेशल एक्सप्रेस शुक्रवार,दिनांक 19.11.2021 धावणार आहे. सदर गाडी पंढरपुर स्थानकावरून शुक्रवार रात्री 08.00 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक कुर्डुवाडी आगमन रात्री 08.45 प्रस्थान 08.50, बार्शी टाऊन आगमन रात्री 09.25 प्रस्थान 09.27, उस्मानाबाद आगमन रात्री 10.25 प्रस्थान 10.30, लातूर आगमन रात्री 12.55 प्रस्थान 01.00, लातूररोड, घाटनंदुर, परळी वैजनाथ, गंगाखेर, परभणी, पुर्णा, आणि नांदेड एच. एस., मुद्खेड, भोकर, हदगाँव रोड, हिमायात् नगर, सहस्रकुण्ड, धनोरा डेक्कन, बोधादी बुरुग, किनवट, आदिलाबाद स्थानकावर दुपारी 1.15 वाजता पोहचेल.
• कोचस ब्रेकयान -2 + जनरल-6 + स्लिपर-11 + एसी थ्री टियर-1 = एकूण 20.
• वरिल सर्व पूर्णपणे कोच या आरक्षित असतील. यागाडीचे आरक्षण उद्या बुधवार, 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या गाडीला विशेष चार्ज आकारले जातील.
कोविड-19 संदर्भातील राज्य व केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकांवर केले जाणार आहे. कोविड-19 शी निगडीत इतर सर्व खबरदारी देखील सुनिश्चित केल्या जातील.