सोलापूर : घराच्या मोबाईलवर मेसेज आणि फोन केल्याच्या कारणावरून सायकलची चेन दगड आणि लाथाबुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत ट्रॅक्टर चालकासह तिघे जण जखमी झाले . ही घटना जळभावी ( ता .माळशिरस ) येथे शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात माळशिरसचे पोलिसांनी महिलांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला .
संज्योत उर्फ दादा महादेव पाटील (वय २५ रा. जळभावी )असे जखमीचे नाव आहे . तो दुपारच्या सुमारास घरातून ट्रॅक्टर घेऊन निघाला होता .माणकी येथील रामडोह ओढ्याजवळ दुचाकीवरून आलेल्या गोरख मारुती शेंबडे ,धुळदेव शेंबडे ,अंकुश सुळ आदीनी ट्रॅक्टर अडवून त्यांना सायकलची चेन आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली .त्यानंतर त्याला श्रीपती शेंबडे यांच्या बंगल्या जवळ घेऊन पुन्हा बेदम मारहाण केली . तेव्हा जखमी पाटील यांचे घराचे लोक सोडण्यासाठी आले होते . त्यांना देखील दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. अशी नोंद पोलिसात झाली .हवालदार थोरात पुढील तपास करीत आहेत.
* रविवार पेठेत विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – रविवार पेठेतील शिंदे मैदानाजवळ राहणाऱ्या किसन चंद्रकांत मंजेली ( वय२७) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना आज सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
किसन मंजेली हा विवाहित असून त्याची पत्नी दोन वर्षापासून माहेरी गेली होती. आज पहाटेच्या सुमारास घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये त्याचा मृतदेह छताच्या लाकडी वाशाला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची नोंद जेलरोड पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही . हवालदार राठोड पुढील तपास करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* सावळेश्वरजवळ अपघात पादचारी महिला ठार
सोलापूर : पुणे महामार्गावरील सावळेश्वर दर्ग्याजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने आणि अंबुबाई बसप्पा भंडारे (वय ५० बापुजी नगर, सोलापुर) ही पादचारी महिला गंभीर जखमी होऊन मरण पावली. सोमवारी (ता. ८) पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. त्यांना टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ती उपचारापूर्वीच मयत झाली. अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
* शेळगी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – शेळगी येथील आदर्श नगरात शिलसिद्ध यल्लाप्पा गौडनवरून वय (२२ रा. गवळीवस्ती , दमाणीनार ) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. ७) सायंकाळच्या सुमारास घडली. शिलासिद्ध हा दमानीनगर येथे राहण्यास असून तो बहिणीच्या घरी आला होता. काल सायंकाळच्या सुमारास त्याने पत्र्याच्या शेड मधील लाकडी वाशाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. या घटनेची नोंद जेलरोड पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार दुधाळ पुढील तपास करीत आहेत .