मुंबई : दिवाळीनंतर आपण बाँब फोडणार, असा इशारा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दिला होता. त्यानंतर आज फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. बाँबस्फोटातील आरोपी व अंडरवर्ल्डच्या लोकांकडून मलिक कुटुंबाच्या कंपनीला जमीन विकण्यात आली, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान, अंडरवर्ल्डच्या लोकांकडून मलिक कुटुंबाच्या कंपनीने जमीन विकत घेतली, असा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेला आरोप नवाब मलिक यांनी फेटाळला आहे. ‘फडणवीसांकडून फटाके फुटले नाहीत, मात्र उद्या सकाळी 10 वाजता आपण हायड्रोजन बॉम्ब फोडणार, फडणवीस यांचा अंडरवर्ल्डचा काय खेळ महाराष्ट्रात आहे, फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना शहरात होस्टेज बनवले होते, याचा भांडाफोड करणार,’ असे मलिक यांनी म्हटले.
सरदार शाहवली खान व सलीम पटेल अशा टाडाच्या आरोपींकडून मलिक यांनी जमीन विकत कशी घेतली, असा सवाल त्यांनी केला. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी असलेल्या सरदार शाह वली खान हे सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर टायगर मेमनच्या नेतृत्वात बॉम्ब कुठे ठेवायचे याची रेकी केली होती. तसंच मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स भरणारे हे होते. तसंच त्यांना या स्फोटाप्रकरणी संपूर्ण माहिती होती. दुसरे व्यक्ती सलीम पटेल. हा सलीम पटेल म्हणजे एका इफ्तार पार्टीत आर. आर. पाटील यांच्यासोबत फोटो आला. त्यावरुन त्यांना ट्रोल केलं गेलं होतं. हा सलीम पटेल म्हणजे हसिना पारकरचा प्रमुख माणूस होय. त्याच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी तयार व्हायच्या, अशी माहिती फडणवीसांनी दिलीय.
1993 मध्ये आम्ही लोकांचे चिंधडे उडताना पाहिले. हे ज्यांनी केलं त्यांच्यासोबत तुम्ही व्यवहार करता. ही एकच नाही अशा 5 प्रॉपर्टी मला सापडल्या आहेत. त्यातील 4 प्रॉपर्टीत 100 टक्के अंडरवर्ल्डचा अँगल असल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय. हे सगळे पुरावे मी तपास संस्थांना देणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही हे पुरावे देणार आहे. त्यामुळे त्यांनाही कळेल की आपल्या मंत्र्यांनी काय दिवे लावले आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय.
कुर्ल्यात एलबीएस रोडवर गोवावाल्याची जागा होती. सलीम पटेलने त्याची पॉवर ऑफ ॲटर्नी घेतली. त्या जमीनीचा दुसरा एक भाग शाह वली खान यांच्या नावाने आहे. या दोघांनी जवळजवळ तीन एकरची जागा सॉलिडस नावाच्या कंपनीला विकली. या कंपनीच्या वतीनं त्याच्यावर सही केली ती फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी मलिक यांच्या कुटुंबाकडे आहे. स्वत: मलिक काही काळ या कंपनीवर संचालक राहिले आहेत. महत्वाची बाब म्हणजे सॉलिडसला ही जागा केवळ 30 लाखात विकली गेलीय. मलिक या कंपनीत 2019 पर्यंत होते. मंत्रि झाल्यावर त्यांनी त्या कंपनीच्या पदाचा राजीनामा दिला. ही जमीन त्यांनी खरेदी केली तेव्हा रेट 2 हजार स्क्वेअर फुटने केली गेली. अंडरवर्ल्ड करुन खरेदी केलेली जमीन 30 लाखात खरेदी केली गेली. पेमेंट झालं 20 लाख. सलीम पटेलच्या अकाऊंटवर हे 15 लाख रुपये गेले. उर्वरित रक्कम शाह वली खानला मिळाले.
नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांचे हे आरोप मंत्री नवाब मलिक यांनी फेटाळून लावले आहेत. फडणवीसांनी योग्य माहिती घेऊन बोलावं. मी कोणत्याही अंडरवर्ल्डशी संबंधित माणसाकडून संपत्ती घेतलेली नाही. फडणवीसांनी केलेले आरोप खोटे असून त्यांनी फोडलेले फटाके फुसके निघाले. जे काही आरोप करायचे आहेत ते करा मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा मलिक यांनी दिलाय.
फडणवीसांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्यांनी यंत्रणांकडे जावे. मी चौकशीला तयार आहे, असे आव्हान त्यांनी फडणवीसांना दिले आहे. मी कोणत्याही चौकशीली तयार आहे. नवाब मलिक काही घाबरणारा नाही. मी हसिना पारकरना ओळखत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
there are bronze and brass dining chairs too that looks very elegant because of their color;;
Good replies in return of this query with firm arguments and telling all regarding that.|
Wonderful views on that!